पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सन १९२३ साली सोलापुरास असतां सर विश्वेश्वर अय्या यांचे रीकन्स्ट्रक्टिग इंडिया' या नांवाचे पुस्तक पाहण्यास मिळाले. यांत सर साहेबांनी याच दृष्टीने विचार केला असून त्यांचे व माझे विचार कित्येक ठिकाणी अगदी जुळते दिसून मोठे कौतुक वाटले, त्यांच्या पुस्तकांत लढाई नंतरचे आंकडे व जपानमधील ग्रामसंस्थांची माहिती फार उपयुक्त दिसली व ती आपल्या पुस्तकांत घ्यावी असे वाटले. त्या गोष्टीस त्यांनी मोठ्या मेहेरबानीने व आनंदाने परवानगी दिली याबद्दल त्यांचा मी फार ऋणी आहे. - यानंतर प्राचीन हिंदी राजकीय संस्था, ग्रामपंचायती वगैरे संस्थांची माहिती यांचा समावेश या पुस्तकांत करून ते चालू परिस्थितीपर्यंत आणून ठेवले आहे. शिल्पाचा अभ्यास करणारा मी माणूस. या राजकीय विषयांचा खास अभ्यास असा केलेला नाही. यामुळे माझ्या विवेचनांत अनेक दोष झाले असतील. पण लोकांना एका प्रकागने व दृष्टीने विचार करण्यास प्रवृत्त करावे इतक्याच हेतूने हे पुस्तक लिहिले आहे; व त्या दृष्टीने वाचकांनी याकडे पहावे व चुका दुरुस्त करून घ्याव्या अशी विनंति करून हे निवेदन संपवितों. . नाशिक, मित्ती आश्विन शु. १० शके १८४६. कृष्णाजी विनायक वझे