पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

किचित् निवेदन सन १९१६ साली 'जर्मन महायुद्धांत पाठवितील त्या रणांगणावर जाऊन सांगतील ते काम करण्यास सिद्ध आहे' असे मी सरकारास कळविले. पण ती गोष्ट सरकारने मान्य केली नाही. तेव्हां आता लवकरच सरकारी नोकरी सोडून आजपर्यंत में ज्ञान आपण मिळविले त्याची सुव्यवस्था लावावी व ग्रंथलेखनास सुरुवात करावी असे मी ठरविले. राजकीय संस्थांकडे पाहूं लागून लिहिलेला पहिला निबंध म्हणजे मासिक मनोरंजनांत. छापलेला 'एका जलबिंदूचा प्रवास' हा होय. आपल्या शिक्षणांत धर्माची फार. हेळसांड होते व शाळा-कालेजांतून आपल्या धर्मातील आचारविचारांचे रहस्य-स्पष्टीकरण मुळीच करण्यांत येत नाही व त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनांत आपल्या धर्माबद्दल अनादर उत्पन्न होतो हे पाहून 'धर्मशिक्षणाचा ओनामा ' या नांवाची पुस्तकमाला लिहिण्यास सुरुवात केली. या माले. पैकी तिसरें पुस्तक -हेंदु धर्मातील सोळा संस्कारांवर-लिहीत असतांना हिंदुधर्म हा मानवांच्या सर्व व्यवहारांचे नियंत्रण करणारा असून सर्व शास्त्रांच्या कळसाच्या जागी आहे व यामुळे त्याचे आचार त्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे बदलतात ही गोष्ट वर्णाश्रमसंस्था, जातिसंस्था वगैरे बाबींचा विचार करतांना प्रमुखपणे नजरेस आली व त्यावेळी आपल्या हिंदुस्थानचे पुढे काय व्हावे व होणार हा विचार मनांत येऊन या देशाचें कल्याण व्हावे असे वाटणाऱ्या लोकांनी काय करावे हे सांगण्यासाठी आणि धर्मशिक्षणांत ज्या गोष्टींचा समावेश सविस्तर करणे योग्य नाही असें दिसले त्यांचा विस्तार करण्यासाठी 'भावी हिंदी स्वराज्य' हे पुस्तक लिहिले. या देशाची सर्वांगीण उन्नति चालू परिस्थितीत आपणास कशी करता येईल याचे दिग्दर्शन या पुस्तकांत केले आहे.