Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साली रानटी लोकांची टोळी सरहद्दीवरून येऊन, त्यांचे एका क्रूर सरदारानें कुशानच्या राजाची गादी बळकावली व ४७० सालच्या सुमारास हूण लोक स्कंदगुप्ताच्या राज्यावर आले, तेव्हां त्यांच्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. ४८० सालीं स्कंदगुप्त मरण पावला. तेव्हां गुप्तसाम्राज्य नष्ट झाले. त्याचे वंशज पुढे बराच कालपर्यंत पूर्वेकडील काही प्रांतांवर राज्य करीत होते. स्कंदगुप्ताचे मरणानंतर सुमारे साठ वर्षांनी परमार्थ नांवाचे एका बौद्ध ग्रंथकाराने वसुबंधुचरित नांवाचे पुस्तक लिहिले आहे. त्यांत त्याने एका गुप्त राजाला अयोध्येचा राजा विक्रमादित्य असें म्हटले आहे. व हि-उएन-त्संग याने त्याला श्रावस्तीचा विक्रमादित्य असे म्हटले आहे. परमार्थाचे ग्रंथावरून असे दिसते की, समुद्रगुप्ताने पेशावराहून वसुबंधु नांवाचे विद्वान बौद्ध साधूस मुद्दाम बोलावून आणले. त्याच्या विद्वत्तेचा व वक्तृत्वाचा समुद्रगुप्तावर फार परिणाम झाला. . ... मगध देशाचे राजकीय वर्चस्व जरी नष्ट झाले तरी नालंदसारख्या विद्यापीठाची ख्याति मुसलमान लोकांनी तेथील पुस्तकालये वगैरे जाळून टाकीपर्यंत कायम होती. इ० स०चे ५३९ साली चीनचे बादशहाने बौद्ध धर्माचे ग्रंथ मिळविण्याकरतां व एखादा विद्वान पुरुष आणण्याकरतां मगध देशांत वकील पाठविले. मगध दशाचा राजा जीवितगुप्तं किंवा कुमारगुप्त याने त्या कामावर परमार्थाची योजना केली. व परमार्थ आपल्याबरोबर पुष्कळ ग्रंथ घेऊन इ० स० ५४६ त चीन देशांत गेला. इ० स० १४८ त बादशहाची व त्याची भेट झाली व तो आपले सत्तरावे वर्षों इ० स० ६६९ सालांत चिनांत मरण पावला. - स्कंदगुप्तानंतर त्याचा सावत्रभाऊ पूरगुप्त गादीवर बसला. त्याच्यानंतर नरसिंहगुप्त बालादित्य व त्याच्यानंतर त्याचा मुलगा