पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांत राजा एका उंच पाठीच्या कोचावर आरामशीर बसला असून त्याच्या हातांत वीणा असल्याचे दाखविले आहे. हरिषेण काने त्याचे वर्णन केलेले आहे, त्यांत हा राजा कवी असून गायन वादनशास्त्रांत कुशल असल्याचे लिहिले आहे. या गोष्टीवरून व युद्धांतील त्याच्या पराक्रमावरून त्यास हिंदुस्थानचा नेपोलियन असे म्हणतात. तो इ. स ३७५ वे वर्षांत मरण पावला. त्याने आपल्या गादीवर आपल्या दत्त देवी राणीचा पुत्र दुसरा चंद्रगुप्त यास बसविले. या चंद्रगुप्ताने पहिली स्वारी बंगाल्यांत केली. व पुढे माळवा व काठेवाड प्रांतांतून तो अरबी समुद्राकडे गेला. तेथें क्षत्रपांचे राज्य होते. त्यांचा त्याने पराजय केला, (३८/४०१ ). काठेवाड व माळवा प्रांत त्याला मिळाल्यामुळे, इजिप्तमधून युरोपच्या व्यापाराशी त्याचा संबंध आला. या वेळेस काठवाडांत सत्यसिंहाचा मुलगा रुद्रसिंह हा क्षत्रप होता. त्याचा त्याने पराभव केला, व त्याला ठार मारून त्याचे राज्य आपल्या राज्यात सामील केले. ह्या वर्षापासून(इ. स.३८८) पुढें क्षत्रपाचें नांव एकू येत नाही. समुद्रगुप्ताचे वेळेपासून राजधानी, नगर पाटलिपुत्र नसून अयोध्या हे होते. अशोक राजाच्या ज्या स्तंभावर समुद्रगुप्ताने आपले पराक्रम लिहिलेले आहेत, तो स्तंभ कौशांबी येथे पूवा होता. हे शहर उज्जनीचें उत्तरेस होतें. अलाहाबाद जिल्ह्यांत कासम नावाचे गाव आहे. तेंच प्राचीन कौशांबी असावे असा कांहींचा अभिप्राय आहे. समुद्रगुप्त व चंद्रगुप्त यांसारख्या लढाईत गुंतलेल्या राजांना पाटलिपुत्र नगराच्या सुधारणेकडे विशेष लक्ष देता आले नाही. तथापि सहावे शतकापावेतों तें शहर चांगले भरभराटीचे स्थितीत होते. इ. स. ६४० चे सुमारास हिऊएनत्संग तेथे आला, तेव्हा त्या शहरांत चोहोकडे पडापड झालेली त्याला दिसली. लोक