________________
व ईशान्य दिशांच्या मार्गाने परदेशांतून या देशांत आले, तर काहीं ग्रंथकाराचे म्हणणे ते लोक या देशांतीलच मूळचे रहिवाशी होते. छोटानागपूर प्रांतांतील संतल लोक व मलबारचे पनियन लोक हे मळच्या द्राविड लोकांपैकी असावेत. द्रविडी . लोकांनंतर चीन देशांतन पिवळट रंगाचे मंगोलियन जातीचे लोक तिबेट मार्गाने व ईशान्येकडील पर्वतांच्या मार्गाने हिंदुस्थानांत आले. त्यांचेनंतर प्रसिद्ध आर्यलोक आले. . ___ आर्य लोकांनंतर ग्रीक, युएची नांवाचे चिनांत राहणारे लोक, शक, पहल्लव व हूण लोक आले व अगदीं आलिकडे युरोपखंडांतील पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज लोक आले. ___ आर्य लोक आल्यापासून हिंदुस्थान देशाच्या स्थितीत फारच बदल झाला. त्यांच्या शौर्यापुढे व चातुर्यापुढे मूळच्या रहिवाशांचे कांहीं चालेनासे झाले व त्यांपकी पुष्कळ जाती डोंगरांत निघन गेल्या. जे लोक राहिले त्यांच्यावर आर्यांचे चालीरीतीचा, धर्माचा, व भाषेचा फारच परिणाम झाला. या आर्य लोकांपासूनच यरोपखंडांतील व मध्य व पश्चिम आशिया खंडांतील मोठमोठाली राप्टें उत्पन्न झाली. या आर्य लोकांचे मूळ वसतिस्थान उत्तर ध्रुवाजवळील आर्टिक प्रदेशांत होते, असें राजश्री बाळ गंगाधर टिळक यांचे मत आहे व ते सिद्ध करण्याकरितां त्यांनी फार सबळ आधार दाखविले आहेत. अद्यापपावेतो त्यांचे मत सर्व विद्वानांना जरी मान्य झाले नाही, तथापि पूर्वीची प्रो. मोक्षमुल्लर. वगैरे पौर्वात्य प्राचीन इतिहासज्ञांची जी कल्पना होती की, आर्यांचे मूळ वसतिस्थान मध्य आशियांत काम्पिअन समुद्राचे आसपास किंवा काकेशस पर्वतानजीक होते ती कल्पना निराधार आहे, असें ठरले आहे. संस्कृत व झेंड भाषेतील पुष्कळ शब्दांचे ग्रीक, ल्याटिन वगैरे युरोपखंडांतील भाषांतील शब्दांशी असलेल्या ऐक्यावरूनच