________________
उपोद्धात. भूगर्भादि शास्त्रांच्या तज्ञांच्या अर्वाचीन शोधावरून असें समजते की, सहस्रावधि वर्षांचे पूर्वी हिंदुस्थान देशाचा आकार सांप्रत काळी आहे त्यापेक्षां फार भिन्न होता. हल्ली हिंदुस्थान, दक्षिणआफ्रिकाखंड, व आस्ट्रेलिया बेट यांचे दरम्यान महासागर आहे प्राचीन, काळी त्या ठिकाणी पाणी नसून जमीन होती, व आदि काखंड, हिंदुस्थानदेश, व आस्ट्रेलियाबेट हे सर्व प्रदेश एकमेकांस जोडलेले होते. कालांतराने मधली जमीन समुद्राखाली बुड़न जाऊन वर सांगितलेले तिन्ही प्रदेश वेगळे झाले, व हिंदस्थानाला सांप्रतचे द्वीपकल्पाचे रूप आले. तसेंच हिंदुस्थानच्या वायव्य व ईशान्य सरहद्दीवर हल्लींच्यापेक्षां जाण्यायेण्याचे मार्ग जास्त सोपे होते. हिंदुस्थानदेशाचे प्राचीन इतिहासाचे महत्त्व विशेष आहे याचे कारण असे आहे, की, या देशाचा संबंध फार प्राचीनकाळापासन जगांतील सुधारलेल्या सर्व राष्ट्रांशी होता. ईजिप्त, व्याबिलोन, चीन, जावा, ग्रीस, इटली, अरबस्थान वगैरे देशांशी हिंदुस्थानचा व्यापार होता. त्यामुळे त्या देशांशी दळणवळण चालू होते. ही गोड पथ्वीचे पाठीवरील फारच थोड्या देशांसंबंधाने म्हणता येईल. हिंदस्थानचे मूळ रहिवाशी कोण होते व ते कोठन आले हैं अद्याप खात्रीने सांगता येत नाही. कांहीं शोधकांचे म्हणणे असे आहे की, मूळचे रहिवाशी निग्रो ऊर्फ शिद्धी जातीचे असावेत. अद्यापपावेतों कोठें कोठें गारेची ओबडधोबड हत्यारे व बिन घडलेले दगडांची वर्तुळे हिंदुस्थानचे काही भागांत सांपडतात. ती या लोकांचे वेळची असावीत. या लोकांनंतर द्राविड , लोक हिंदस्थानांत आले. काही लोकांचे म्हणणे ते हिंदुस्थानचे वाय