पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ २ ] श्री समुद्रगुप्त ” अशी अक्षरे लिहिलेली आहेत. ( ११ ) नमुन्याचे नाणे समुद्रगुप्ताचंच आहे. त्यावर अश्वमेधाचे प्रसंगी होमकुंडासमोर अश्व उभा राहिलेला दाखविला आहे. ( १२ ) चा नमुना दुसरा चंद्रगुप्त ऊर्फ विक्रमादित्य याच्या नाण्याचा आहे. एका बाजूस सिंहावर आरूढ झालेली देवी दाखविलेली आहे, व " श्री सिंह विक्रम " अशी अक्षरे लिहिलेली आहेत. दुसऱ्या बाजूस राजा सिंहाची शिकार करीत असल्याचे दाखविले आहे. महाराजाधिराज श्री " अशी अक्षरे लिहिलेली आहेत. ( १३ ) चा नमुना कीर्तिवर्म चंडेल याचे नाण्याचा आहे. एका बाजूस चतुर्भुजा देवीचे चित्र आहे. दुसऱ्या बाजूस “ श्रीमत् कीर्तिवर्म देव " अशी अक्षरे आहेत. ( १४ ) चा नमुना एका पांड्य राजाचे नाण्याचा आहे. एका बाजूस कांहीं अक्षरे आहेत. ती समजत नाहीत. दुसऱ्या बाजूस एका छत्राखाली दोन मासे दाखविले आहेत. (१५) चा नमुना राजराज चोल राजाचे नाण्याचा आहे. एका बाजूस एक बसलेली आकृती आहे. “ राजराज " अशी अक्षरे लिहिलेली आहेत. दुसऱ्या बाजूस राजा उभा राहिला असल्याचे दाखविले आहे. ( १६ ) चा नमुना एका पल्लव सरदाराचे नाण्याचा आहे. एका बाजूस एक मोठ्या चंबूच्या आकृतीचे भांडे आहे. दुसऱ्या बाजूस सिंहाचे चित्र आहे. (१७) चा नमुना चर राजाचे नाण्याचा आहे. एका बाजूस छत्री व धनुष्य आहे. दुसऱ्या बाजूस एक बसलेली आकृती आहे.