Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुस्तानांतील प्राचीन नाण्यांचे काही नमुने. न हे हिंदुस्थानांतील प्राचीन नाण्यांचे नमुने मि. विन्सेंट स्मिथ यांचे इतिहासावरून घेतले आहेत. एकंदर सतरा नमुने आहेत.. त्यापैकी सहा नमुने ग्रीक व सिथियन राजांचे आहेत. त्या राजांचा अम्मल ब्याक्ट्रिया प्रांत व हिंदुस्थानचा काही भाग यांत होता. ते नमुने एक ते सहापावेतों आहेत. त्या राजांची नावें अनुक्रमें येणेंप्रमाणे आहेत:-(१) सोफायर्टीज; (२) युक्रटैडीज; (३) मेन्यांडर; (४) हरमाइओस; (६) पहिला कदफिसीज.. (६ ) गोंडोफरीज. यांपैकी ( १) च्या नमुन्याचे व (२) च्या नमुन्याचे मागील व पुढील असे दोन भाग आहेत. ३. ४, ५, ६,) च्या नमुन्यांचे एकेकच भाग आहेत. यांवरील लेख ग्रीक भाषेत आहेत. संख्याक सातचा नमुना आंध्रवशांतील सिवलकुर नांवचे राजाचे नाण्याचा आहे, त्यावर " राणो माधरी. पतस शिवलकरस" अशी अक्षरे आहेत. (८) व्या नमुन्याचे दोन भाग आहेत. ते नाणे दुसरा कफिसीज या राजाचे आहे. त्याची लिपी खरोष्ठी आहे. एका बाजूस शिव व नंदी यांची चित्रे आहेत. दुसरं बाजस राजाचे चित्र आहे व त्याचे भोंवतालचाल भाषेत आहे. (९) व्या नमुन्याचे दोन भाग आहेत. ते नाणें कनिष्क राजाचे आहे. एका बाजूस देवीचे चित्र आहे व दसरे बाजूस भाला व तरवार हातांत धरलेल्या राजाच आहे. त्याचा पोषाख तुर्की आहे. त्यावरील लेखाची भाषा ग्रीक आहे, (१०)चा नमुना समुद्रगुप्ताचे नाण्याचा आहे. राजा आराम खुर्चीवर बसलेला असून हातांत विणा असल्याचे दाखविले आहे. “ महाराजाधिराज