Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याग केला होता. त्यांना मुख्यत्वेकरून वेदांचे व यज्ञयागांचे जे बंड माजले होते व ज्यामुळे हिंसा अतिशय होऊ लागली होती तें बंड मोडून व ते वर्चस्व टाकावयाचे होते. ब्राह्मणांना बौद्धांचा द्वेष वाटण्यास हे मुख्य कारण होतें. ____ अशोक राजाची बौद्ध धर्मावर जरी निस्सीम भक्ति होती तरी इतर धर्मासंबंधाने त्याचा द्वेष नव्हता, इतकेच नव्हे तर, त्याचे म्हणणे सर्व धर्मात कांहींना कांहीं तरी सत्याचा अंश आहेच असें होते. त्याचा मुख्य हेतु सर्व लोकांत नीति व सत्य यांची वृद्धि व्हावी हाच कायतो होता. बौद्ध धर्माचा -हास होऊन ब्राह्मण धर्माचे वर्चस्व सुरू झाल्याचे स्पष्ट चिन्ह समुद्रगुप्ताने अश्वमेध यज्ञ केला हे होय. ही गोष्ट इतकी महत्त्वाची होती की, समुद्रगुप्ताने त्या प्रसंगी मुद्दाम विशेष सुवर्ण नाणी पाडून त्यांवर · अश्वमेध पराक्रम ' अशी अक्षरें खोदलीं व अश्व मोकळा सोडल्याचे चित्र त्यांवर काढले. दुसरा चंद्रगुप्त,कुमारगुप्त व स्कंधगुप्त यांचे नाण्यांवर त्यांना 'परम भागवत ' असे म्हटले आहे. इ० स० ४०० सालांतील उदयगिरीचा एक लेख आहे, त्यावर विष्णु व चंडी देवीच्या मूर्ति आहेत. इ० स० ४ १४ सालापासून इ० स० ५७० सालापर्यंतचे लेखांवरून ब्राह्मणधर्माचे वर्चस्व स्थापित झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिव, विष्णु, मूर्य व महासेन या देवांची भक्ति फार प्रचारांत आली. या काळाच्या पूर्वीच्या लखात पाली अथवा प्राकृत भाषा होती, ती जाऊन तिच्याऐवजी सर्वत्र संस्कृत भाषा सरू झाली. यावरूनही ब्राह्मणांचे वर्चस्व स्थापित झाल्याचे सिद्ध होते. कनिष्क राजाचे वेळेस अश्वघोषाने बुद्धचरित्र लिहिलें तें उत्तम संस्कृत भाषेत लिहिले. तें चरित्र दुसऱ्या शतकाच्या शेवटी लिहिले असावें. कनिष्क राजाने बुद्ध परिषद भरविली, त्या वेळेस तीन