पान:भारत-मावळे मराठा-मेळा पदें.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ जो ॥ पडे मार खाऊनी मिश्रीत भूमीवर ॥ जी ॥ ज या भोईन मांडीवर घेऊन वारा घाली फार ॥ जी ॥ जणू तिच्या पोटचे मूल तसे प्रेम त्यावर || जी || पाणी पाणी म्हणून नाहीं जवळ झाले बेजार ॥ जी || जसा मुडदा उ चलती तसेच दावी नदी तीर ॥ जो ॥ ॥१६॥ ॥ पुर्व ॥ अशी स्थिती बिकट जरी केली । प्रभु त्यांचा बाली । सत्यागृहानीं हात नाहीं लावला | किती थोरपण द्यावे त्या- ला। गणीत नाहीं याला | याचा जाणता जगीं नाहीं उर- ला ॥ जो ॥ ॥१७॥ ॥ चाल ॥ वाईट कृत्य करण्यास कोण उत्तेजन देत ॥ जी ॥ त्या- वरचे अधिकारी गुंडास सांगत ॥ जी ॥ ही आपली जाते ओळखुनी जातींवर जात ॥ जी ॥ ज्याचे खावें मीठ स्यास शिव देऊन बोले नीट ॥ जो ॥ ॥ १८ ॥ ॥ पुर्व ॥ पहा अधिका-याची चतुराई । बोले तरी काहीं । गोरे यानें केले म्हणे ढोंग । जना मूर्ख बोलतो मांग | सडका से अंग । पाहु मग त्याचे तुझे कां सोंग ॥ जी ॥ ॥ १९॥ डोळ्यानी गुन्हा जरी पाही | सत्या गृहचा नाहीं। कंपनी- चा होतो तरी गप्प । हा नोकरीच्या धुंदीत गर्क । विषारी सर्प । म्हणनी हा बोलण्यामध्ये करी फरक ॥ जी ||२०|| कांहीं मुळे लहान लहान पाहून | टंगडीला धरून । दुष्ट ते पूंड देती फेकून । कांहीं मुलांच्या नरडयावर | पाय देऊन । गळा दाबून घेती जसा प्राण ।। जी ॥ ॥ २१ ॥