Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३वा ]

३७

आर्यांची शासनपद्धति.

आपल्या प्रजेपासून करभार घेऊन देखील जर राजा ति संरक्षण करणार नाहीं, अथवा तिला न्याय देण्याचें वर्जील तर, तो इहजन्मनि अनादराप्रत प्राप्त होऊन, जन्मांतरी ही अतीव कष्ट भोगील.
 मनुस्मृतींत नानाविध धर्म, कर्माचरण, व आचार- मनुस्मृतीतील नानाविध विषय. विधि, यांचेंच केवळ विवेचन आहे असें नाहीं; तर तींत फौजदारी का- यदा, दिवाणी कायदा, पुराव्याचा कायदा, कराराचा कायदा, मुदतीचा कायदा, इत्यादि- कांची देखील मूलतत्त्वें थोड्या बहुत प्रमाणाने सांगितलीं असल्याचे दिसून येतें.

फौजदारी कायदा.

 १ राजेद्रोह; २ राजशत्रुसेवा; ३ राजकोशहरण; ४ राजपशुहरण ५ मनुष्यवधै; ६ स्त्रीपुरुपहरण; प्रहार ( अपखुशीनें दुखापत करणें ); ८ त्वर्गभेद ( मोठी दुखापत ); ९ अंगविक्षेप ( अंगावर धाऊन जाणें ); १०


१ म. स्मृ. अ. ८ श्लो. ३०७ ६ म. स्मृ. अ. ८ श्लो. ३२३ २ कित्ता. ,, ९ ,, २३२ ७ ,, ,, ८ ,, २८० ३ ,, ,, ,, २७५ ८ ,, ,, ,, ,, २८४ ४ ,, ,, ८ ,, ३९९ ९ ,, ,, ,, ,, २७१ ५ ,, ,, ९ ,, २३५