Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२वा ]

३१

आर्याची राज्यव्यवस्था.

प्रकारचे हलके काम करणारास रोज एक पेण देत जावा; किंवा महिन्याच्या मुशाहिऱ्यानेंच त्यास ठरविला असल्यास, त्याला द्रोणभर धान्य द्यावें; किंवा त्याचा मुशाहिरा षाण्मा- सिक ठरला असल्यास, त्याला वस्त्रयुग द्यावें. मध्यम काम करणारास, वर लिहिलेल्या अनुक्रमानेच तीन पण, धान्याचे तीन द्रोण, व सहा वस्त्रे द्यावीं; आणि उत्तम प्रकारचें काम करणारास अनुक्रमें सहा पण, सहा धान्याचे द्रोण, व बारा वस्त्रे द्यावी; असे स्मृतिकार ह्मणतात.
 असो. याप्रमाणें आपल्या राज्यांतील कुलबाब, व कुल- कानु, जकात व कर, मुशाहिरा चाही पुरुषार्थ. व रोजमुरा, इत्यादिसंबंधी हरएक प्रकारें व्यवस्था लावून, राजानें चिरकाल साम्राज्य भोगावे. तथापि, त्यानें आळशी राहून स्वस्थ बसतां कामा- नये. चाही पुरुषार्थ ज्या ज्या उपायांनीं प्राप्त होतील, ते ते


१ अशीतिभिर्वराटकैः पण इत्यभिधीयते ॥ ( म. स्मृ. ).

म्हणजे ऐंशी ( ८० ) कवडयांचा एक पण होय.
२ अष्टमुष्टिर्भवेकिचित्किचिदष्ठौच पुष्कलम् ।
पुष्कलानि च चत्वारि आठकः परिकीर्तितः ॥
चतुराठको भवेद्रोणः ॥ ( म. स्मृ. ).
३ अलब्धं चैत्र लिप्सेत लब्धं रक्षेत् प्रयत्नतः ।
रक्षितं वर्धयेच्चैव वृद्धं पात्रेषु निःक्षिपेत् ॥ ९९ ॥
भलब्धमिच्छेद्दंडेन लब्धं रक्षेदवेक्षया ।

रक्षितं वर्धयेद्धा वृद्धं दानेन निःक्षिपेत् ।। १०१ ॥

( म. स्मृ. अ. ७.)