Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०

[ भाग

भारतीय साम्राज्य..

बंदोबस्त करण्याच्या कामी राजानें झटावें. गांवचें काम सुरक्षित रीतीने चालण्यासाठीं, प्रत्येक गांवांत एक ग्रामाधिकारी नेमावा.तदनंतर जशी अवश्यकता असेल त्याप्रमाणें दहा, वीस, शंभर, किंवा हजार, अशा गांवां- वर एक मुख्य कामगार नेमून, प्रत्येकावर त्याच्या वरिष्ठाचा ताबा राही अशी व्यवस्था ठेवावी.
 तदनंतर, सदरहूप्रमार्णे नेमलेल्या नोकरांचा मुशाहिरा तत्संबंधी कामगा- रांचा मुशाहिरा देण्याविषयीं, व त्यांनी आपल्या वतनाखेरीज इतर कोणत्याही कुमा- र्गाचें अवलंबन करूं नये ह्मणून आणि त्यांनीं लाच घेऊं नये एतदर्थ, फारच सुरेख व सविस्तर विवेचन मनुस्मृतीत दृष्टीस पडतें. लांच घेणारास बरीच कडक शिक्षा सांगितली असून, त्याची सर्व जिनगी व मालमत्ता जप्त करून त्यास हद्दपारही करावें, असें स्मृतिकरांचें वचन आहे.
 झासारवण करणें, पाणी वगैरे आणणे, इत्यादि


१ मनुस्मृति अ. ७ श्लोक ११६।११७.

२ म. स्मृ. अ. ७ श्लो. ११८ ११९/१२६.
७ ये कार्यकेभ्योऽर्थमेव गृह्णीयुः पापचेतसः ।
तेषां सर्वस्वमादाय राजा कुर्यात्प्रवासनम् ॥

( म. स्मृ. अ. ७ श्लो. १२४. )

४ पणोदेयोऽवकृष्टस्य षडुत्कृष्टस्य वेतनम् ।

षाण्मासिकस्तथाच्छादो धान्यद्रोणस्तु मासिकः ॥ १२९ ।।

( म. स्मृ. अ. ७)