२७
साठीं, पैशाची मदत भरपूर पाहिजे. सबब आपल्या
प्रजावर्गीपैकीं कोणाकडून किती करभार घेणें अवश्य
आहे, हें यथान्याय ठरविण्यास, त्याने काळजीपूर्वक
झटावें. राजानें कोणापासून किती घ्यावें याविषयीं मनु-
स्मृतींत चांगलें विवेचन केले आहे.
मूळच्या ठवांत सुवर्णादि मौल्यवान् धातु, रत्नादिमणि
धंदेवारी प्रमाण
कराचा यथान्याप
विभाग.
आणि अश्वादि पशु, यांची जी भर
प्रतिवर्षी पडेल, तिचा (१/२०) एक
पन्नासांश; जे धान्य पिकेल त्याचा,
( जमिनीच्या मगदुराप्रमाणे व प्रसंगास अनुसरून ),
(१/१२) एक बारांश, (१/८) एक अष्टमांश, किंवा (१/६) एक
शष्ठांश; पत्रे, शाक, तृण, वृक्ष, मांस, मध, घृत, गंध,
औषधि, रस, पुष्प, मूल, चर्मपदार्थ, आणि मृत्तिकेची
व दगडाची भांडी, इत्यादिकांवर (ई) एक शष्ठांश; व्यापार
करणाऱ्यांकडून त्यांच्या वर्षाच्या प्राप्तीप्रमाणे थोडा बहुत
धान्यानामष्टमो भागः षष्ठो द्वादश एव वा ॥ १३० ॥
२ आददीताथ षड्भागं द्रुमांसमधुसर्पिषाम् ।
गंधोषधिरसानां च पुष्पमूलफलस्य च ॥ १३१ ॥
पत्रशाकतृणानां च चर्मणां वै दलस्य च ।
मृन्मयानां च भांडाना सर्वस्याश्ममयस्य च ॥ १३२ ॥
3 यत्किचिदपि वर्षस्य दापयेत्करसंज्ञितम् ।
( मनुस्मृति अ. ७ ).