Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६

[ भाग

भारतीय साम्राज्य.

पाश्चात्य देशांतील इंग्रज लोकांनी, बऱ्याच बाबतीत, पुष्कळ अंशी चांगले केले आहे.
 रणांत उपलब्ध झालेल्या धनाविषयीं देखील सविस्तर नियमन मनुस्मृतींत केल्याचे दिसून युद्धजित द्रव्य. येतें. “ उद्धार " म्हणजे उत्कृष्ठ धन, तसेंच सोनें, रुपें, इत्यादि मौल्यवान् आणि इतर हीण- कस धातु, व हत्ती, घोडे, रथ, छत्र, वस्त्रादि भूषण, आणि स्त्रिया, इत्यादि सर्व राजाचाच भाग असून, त्या व्य- तिरिक्त जें कांहीं राहील तें राजानें ज्या त्या शूर पुरुषाच्या पराक्रमाप्रमाणे, ज्याला त्याला यथान्याय वांटून द्यावें. असो. याप्रमाणें अन्य देश काबीज करून, स्वमुलु- खांत व परमुलुखांत शांतता झाल्या- वर, राजानें आपल्या मंत्रिमंडळाशीं खर्चासाठीं करभा- राची व्यवस्था. पेटाने न वर्ततां, एकदिलाने राज्यां- तील अंतःस्थिति सुधारण्याच्या कामास एकदम लागावें. आतां, अशा प्रकारच्या कामी, सर्वत्र बंदोबस्त राखण्या-


१ रथाश्वं हस्तिनं छतं धनं धान्यं पशूस्त्रियः ।

सर्वद्रव्याणि कुप्यं च यो यज्जयति तस्य तत् ॥ ९६ ॥
रामश्च दद्युरुद्वारमित्येषा वैदिकी श्रुतिः ।
राज्ञा च सर्वयोद्धेभ्यो दातव्यमपृथग्जितम् ॥ ९७ ॥
२ अमाययैव वर्तेत न कथंचन मायया ।
बुद्धतारिप्रयुक्तां च मायां नित्यं स्वसंवृतः ॥ १०४ ॥

(मनुस्मृति. अ. ७)