Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२

[ भाग

भारतीय साम्राज्य
.

पत्तिक अशी संज्ञा असून, अशा दहा पत्तिकांवर जो मुख्य असतो त्याला सेनापति, आणि अशा दहा सेना- पतीवर ज्याचा अम्मल असतो त्याला सेनानायक असें म्हणतात. याप्रमाणे सर्व प्रकारची कडेकोट तयारी झाल्यावर, (१) दंड, (२) शकट, (३) वराह, (४) मकर, (५) सूची, न्यूहरचना. आणि (६) गरुड, इत्यादि नाना प्रका- रचे व्यूह प्रसंगानुसार रचून, शत्रूवर चाल करावी; आणि सर्व सेनेला स्फुरण येऊन आपले काम फत्ते होण्यासाठी, वीर्यश्रीची भाषणे व जयघोष करून, शत्रूची दाणादाण करून टाकावी.

प्रहर्षयेद्वलं व्यूह्य तांथ सम्यक्परीक्षयेत् ।

चेष्टाश्चैव विजानीयादरीन् योधयतानपि ॥ १९४ ॥
उपरुध्यारिमासीत राष्ट्रं चास्योपपीडयेत् ।
दूषयेच्चास्य सततं यवसान्नोदकेन्धनम् ॥ १९५ ॥
freitastic प्राकारपरिखास्तथा ।

समवस्कन्दयेचैनं रात्रौ वित्रासयेत्तथा ॥ १९६ ॥

( मनुस्मृति. अ. ७ )

 असो. वध्यावश्य विचारांत हिंदूंची अनुकंपा खरोखर अनुकरणीय आहे. तसेच, धर्मयुद्ध बध्यावध्य विचारांत करण्याच्या संबंधाने देखील त्यांनी हिंदूंची अनुकंपा. केलेले नियम प्रशंसनीय आहेत.


 मनुस्मृति. भ. • श्लोक. १८७