Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ भाग

भारतीय साम्राज्य.

रका किंवा पुढारी असून, त्या सर्व शाखां मिळून सर्वानु- मतें पसंत केलेला एक अधिपति असे. अशा मनुष्याची प्रमुखस्थानीं योजना करण्यांत, त्या वेळचे आर्य चांगलाच विचार करीत असल्यामुळे, हा निवडलेला सेनानायक परा- क्रमशील असून नीतिमान असे; साहसी असून सदा- चारी असे; व धैर्यवान् असून विचारवंत असे. आणि कधीं कधी तर, ऐहिक व पारमार्थिक ज्ञानांत सुद्धां तो फार तिची पीठिका. निपुण असे. आतां, समाजाच्या नूतन किंवा प्रथमावस्थेत, फक्त शौर्य हा एकच गुण कोणाच्या अंगांत वास करीत असला तरी देखील त्याला आधिपत्य मिळण्यास अडचण पडणार नाहीं. मग, सदरी लिहिलेल्या सर्व गुणेकरून जो नरपुंगव अलंकृत असेल, त्याला प्रभुत्व मिळण्यास काय उशीर ? या-प्रमाणे, ह्या आर्याधिपतीस साहजीकच नृपत्व प्राप्त हो-ऊन, तो आर्यांचा नरपति बनला. आणि हीच परंपरा, आज सुमारें आठ दहा हजार वर्षांच्या ऐतिहासिक घडा- मोडींत, आज दिनपर्यंत सतत चालत आली आहे.
 ह्या लोकनिर्मित प्रभूची बहुत करून अनियंत्रित सत्ता असे. तथापि, तो स्वतः ज्ञानसंपन्न आणि विवेकी असल्यामुळें, तो आपल्या अधिकाराचा प्रायः कधीच दुरुपयोग करीत नसे. क्वचित प्रसंगी, हा नरपति ज्ञानहीन असल्या कारणानें