पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२वा] आर्यभाषा. या पंच तत्वांचा, व स्थावर जंगमात्मक नैसर्गिक बाह्य शक्तींचा, प्रथमतः आर्य लोकांच्या मनावर कसा संस्कार झाला, व त्यामुळे त्या तत्वांकडेसच त्यांनी प्रथमारंभी कसें ईशत्व दिलें; त्यानंतर कांही कालानें त्यांची विचार- शक्ति जास्त वाढल्यावर त्या पंचतत्वांचाही कोणी तरी आदिकर्ता असावा, असें क्रमाक्रमानें त्यांच्या मनांत कसें भासत गेलें; व पुढें, कालवशात् ते आदिकारण व ती चिच्छक्ति, नियमित स्थलांत किंवा वस्तूंतच नसून तिची आब्रह्मस्तंभपर्यंत व्याप्ती आहे, अशाविषयीं त्यांचें तर्कज्ञान कसें उदयाप्रत पावलें; आणि चराचर सर्व वस्तूंत तें निर्विकार परब्रह्म ओतप्रोत भरलेले असून भासमान होणारें विलक्षण विराट् स्वरूप त्याचीच विभूति आहे, असे निश्चयात्मक त्यांच्या मनांत शेवट करें पूर्णपणे बिंबले; अशाविषयीं साद्यंत हकीकंतीचें वेद हे अमूल्य व गुप्त भांडारच आहेत, असे झटल्यावांचून राहवत नाही. १ *** And in that study of the history of the human mind, in that study of ourselves, of our true selves, India occupies a place second to no other country. Whatever sphere of the human mind you may select for your special study, whether it be language, or religion, or mythology, or philosophy, whether it be laws or customs, primitive art or primitive science, everywhere, you have to go to In- पुढे चालू.