पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११वा] आर्यांची सामाजिक रचना व धर्मसंस्था. ६७ नवीन प्रांत जिंकून, ज्या ज्या ठिकाणी ह्मणून हिंदूं- नीं आपली ठाणी बसविली, त्या त्या ठिकाणी त्यांनी सुधारणा केली, आपला धर्म स्थापिला, पराजितांस विद्या- दान दिलें, त्यांस शास्त्र शिकविलें, सर्व कला उदयास आ णिल्या, आणि आपल्या कडकडीत आचरणाने नीतितत्वाचें सोज्वळ प्रतिबिंब त्यांच्या हृत्पट्टिकेवर उठविलें. केवळ तरवारीच्या जोरावर ते उन्मत्त झाले नव्हते. इतकेंच नाहीं तर, त्यांनी आपल्या शौर्याच्या मानानें, व पराक्रम सूर्याच्या तेजाच्या प्रमाणानें, सत्ववृत्तीचें पूर्ण अवलंबन करून, अनेक देश काबीज करण्याचे काम केले, आणि त्याबरोबरच सुधारणेचें व शांततेचें बीज सर्वत्र पेरलें. मुसलमान लोकांप्रमाणे त्यांची केवळ समशेर बहाद्दुरी - वरच नजर नव्हती. तर, आमच्या सांप्रतच्या आंग्ल प्रभूंप्रमाणे, ते भारतीय आर्य ( ह्मणजे हिंदू ), हे विजय व विद्या, शौर्य व शांतता, पराक्रम व प्राविण्य, स्वातंत्र्य व संतोष आणि राजा व प्रजा यांची नैसर्गिकच, सांगड आहे असे समजून, ते सर्वोस समदृष्टीनें पहात, व ते सर्व गुण विशेषतः चांगल्या कार्यासाठींच एकमेकांवर ( मागीलपृष्ठावरून पुढे चालू. ) speak of an Indian origin and even now strike the beholder with admiration." (Times of India, 1st October 1892.)