पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वां ] कोप. २३३ किंवा विलांसलावण्य, रमणीयश्री अथवा माधुर्यविशेष, इत्यादिकांचे अग्रेसर हिंदूच होत. कोष, 1222 आतां संस्कृत भाषेच्या संबंधानें विशेष महत्वाच्या अशा फक्त दोनच विषयांचा विचार करणे राहिला आहे. १ भाषाकोष, आणि २ साहित्यशास्त्र. भाषाकोषाची बाल्यावस्था व त्याचें आदिस्वरूप प्रथमतः निघंत दिसून येते. यांत फक्त पर्यायशब्दच दिले आहेत. तथापि, हा ग्रंथ केवळ वेदार्थबोध होण्यासाठींच केला असल्यामुळे, शास्त्रीय व सर्वव्यापक- अशा अन्य कोषाची खरी अवश्यकता होती. व ती उणीव अमरसिंहानें स्वनामव्यंजक असा अमरकोष रचून पुरी केली. हा कोष इतका सुरेख झाला आहे की, त्याच्या पूर्वी व तदनंतर अनेक कोषकार होऊन गेले तथापि, ह्याच्यापुढे कोणाचेंच तेज पडलें नाहीं. इतकेंच नाहीं तर, तो उदयास आल्यापासून आजमित्तीपर्यंत केवळ सतत प्रमाणभूतच होऊन राहिला आहे. अमरसिंह हा विक्रमराजाच्या पदरीं जीं " नव- भाषाकोष व त्या चा कर्ता.