पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टके व काव्ये काव्येषुनाटकं रम्यंतत्ररम्यंशकुंतला । तत्रापिचचतुथकस्तत्रश्लोकचतुष्टयम् ॥ पूर्वीच्या काही विद्वज्जनांच्या मतें कालिदासाचा अत्युज्ज्वल गुण ह्मटला ह्मणजे उपमाचातुर्य; परंतु खरो- खर पाहतां त्याच्यांत अर्थगौरव आणि पदलालित्य, हीं देखील तितक्याच उत्कट प्रमाणांनी दिसून येतात. कां- ह्रींचें असें मत आहे की, अर्थगौरव असे भारवीचें; पदलालित्य असें दंडीचें; उपमा अशी कालिदासाची; आणि सदरहू तिन्ही गुण माघ कवीच्या ठायीं होतं. असो. असे जरी आहे तरी कालिदास हा सर्व गुणांनी श्रेष्ट असल्यामुळे, त्याची कवींद्रांत गणना करणे केवळ अत्य- वश्य आहे. इतकेंच नाहीं तर, एकं- दर कविसमूहाची गणना करितांना, प्रथमतः जी करंगळी मोडावयाची ती त्याच्याच नांवानें, व तत्सन्मानार्थ, मोडली पाहिजे. कारण, १४वा ] कवीन्द्रांत कालि• दासाची गणना. २२१ पुरा कवीनां गणना प्रसंगे कानोष्टिकाऽधिष्टित कालिदासः । अद्यापितत्तुल्य कवेरभावात् अनामिकासाऽर्थवती बभूव ॥ १ उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवम् । दंडिनः पदलालित्यं माघे संतित्रयो गुणाः ॥