पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] महाभारत. २०१ प्रकारची अनेक उदाहरणे दाखवितां येतील. सबब, त्यांकडे आमच्या भारतीयांनी विशेष लक्ष पोहोंचविलें पाहिजे. नाही तर त्यांच्या मनावर भलतेच संस्कार होण्याचा संभव आहे. कारण, कांहीं नामांकित अपवाद खेरीज करून बाकीच्या बहुतेक पाश्चात्यांचा असा कांहीं भल- ताच ग्रह होऊन गेला आहे कीं, आपलें तेवढे चांगलें आणि आशियस्थांचें, व त्यांतही विशेषतः भारतीयांचें तेवर्डे वाईट. तेव्हां, अशा प्रकारच्या मनाच्या दूषित अव स्थेंत, ते उघड रीतीनें पक्षपाताचे लेख लिहितात, यांत नवल नाही. यासाठी, भारतीयांनी अशा एकतर्फी आणि पक्षपाती लेखांवर भरंवसा न ठेवितां, सर्व प्रकारच्या ग्रं- थांचें अवलोकन करावें. साधकबाधक कारणांचा पूर्ण विचार करावा. आपल्या मनाची पक्की खात्री करून घ्यावी. विषयाच्या स्वरूपाप्रमाणे दूरवर नजर पोहोंचवावी. व नंतर आपल्या मनाला कायमचें वळण द्यावें. नाहीं- पेक्षां, असल्या अनर्गल लेखांनीं आपल्या मनावर दुष्ट संस्कार होऊन, ह्या अतिपुराण भारतीय राष्ट्रावर वि शेष शोचनीय परिणाम घडून आल्याशिवाय खचित राहणार नाहीं. तथापि, सुदैवेंकरून कांहीं पाश्चात्य फारच सरळ, अगदी निरभिमानी, आणि सदैव अपवाद. निःपक्षपाती आढळतात. अशी रत्ने.