पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] महाभारत. १७९ दृग्गोचर होतें. बौद्ध धर्मानंतर सुमारें चारशें वर्षांनीं स्त्रैस्ततारक उदयास आला असून, त्या धर्माच्या मूलत- त्वांचा त्याजवर चांगला ठसा उमटला, व त्याचा परिणा- मही लौकरच निदर्शनास आला, हे जास्त सांगण्याची अवश्यकता नाहीं. व ह्याच मताचें अवलंबन निःपतक्षपाती आणि सरल मनाच्या पाश्चात्यांनी केल्याचे दिसतें. ते उघडपणे असे प्रदिपादन करितात कीं, मूल बौद्ध धर्माची ख्रिस्ती धर्मरचना ही केवळ हुबेहुब छोटेखानी नक्कलच होय. भगवद्गतिचॆं पौ- पाश्चात्यांच्या दुराग्रहाचा आणखी एक मासला दाख- वितों. भगवद्गीतेंत १ कर्म, २भक्ति आणि ३ ज्ञान, ह्या योगत्रयांचें सम्मिलन असल्या कारणानें, ती वेदाप्रमाणेच आह्मां हिंदू लोकांस परमपूज्य असून, ती त्याच कारणानें फार पुराणग्रंथांत मोडते. कारण, ती सुमारें तीन हजार वर्षीपलीकडीलही काळांतील असल्यामुळे, राणत्व. १. “ That Christianity was but an inferior copy of a greater original." “ That there are startling coincidences between Buddhism and Christianity cannot be denied, and it must likewise be admitted that Buddhism existed at least 400 years before Christianity." ( What can India teach us ? P. 279. By Pro. Max Muller.)