पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य १३० [ भाग त्नाचें फल सहजींच दिसत होतें. शस्यसंग्रहाची उद्दाम श्री सर्वत्र भासत होती. निपुण शिल्पकारांनी आपलें सर्व चातुर्य खर्चून तयार केलेली अप्रतीम वस्त्रे आणि होते. सुतार दिसत होतें. सुंदर तंतुपट, वर्गाचें आबालवृद्ध वापरीत अलौकिक चातुर्य सर्वत्र वस्तुनिर्माण कौशल्य चोहोकडे भासमान होत होतें. गवंड्यांनी देखील आपलें अनुपम्य सामर्थ्य यथावकाश दाखविण्यांत कसर केलेली नव्हती. चक्रव- र्ती, मांडलिक प्रभु, व आर्यवर्ग हे आपल्या ऐश्वर्या- प्रमाणें इंद्रभुवनासारख्या विशाल, भव्य, उज्ज्वल, आणि रमणीय मंदिरांत राहून नानाप्रकारचे विलास भोगीत होते. तसेंच, अशा पराक्रमशील चक्रवर्ती राजांचे व उदार पुरुषांचे पवाडे गाण्यास, आणि सुकीर्तीच्या दुंदुभीची गर्जना करण्यास, कविसमुदायांचीही रेलचेल होती. तत्ववेत्यांची देखील इकडे उणीव नव्हती. तथापि, ते उत्क्रांतीच्या पूर्णावस्थेत असल्यामुळे सृष्टीतील सर्व वैभव व ऐश्वर्य नश्वर समजून, ते अरण्यांत चित्तैकाग्रता करीत, व एकांत वासांत राहत असत. बरें, ही निगमविद्या, हा शास्त्रोदधि, व हे अनेक- कला वैचित्र्य, अशी केवळ कर्ण- परंपराच नव्हती. तर ती सर्व प्रत्यक्ष भासमान असून, उपलब्ध असलेल्या संस्कृत विद्येचा उपयोग.