पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा ] वेद व वेदागे. १२९ सुक्ष्म विवेचनपद्धति, हीं पाहून कोणालाही आश्चर्य वाटल्यावांचून राहत नाहीं. व ह्या अध्यात्मविद्येचा व्यासंग त्यांनी इतक्या पुरातन काळीं केला होता कीं, त्या वेळेस या भूतलावरील इतर सुधारलेली राष्ट्र केवळ गाढ निद्रा- वस्थेंतच होतीं. मिसरदेश तर बा- त्या वेळीं इतर रा ष्ट्रांची गाढ निद्रा, व ल्यावस्थेतच असून त्याचे भव्य, विशाळ, विस्मयकारक, आणि गगनचुंबी मनोरे, अजून अस्तित्वांतही आले नव्हते. यूरोपांतील पत्तनशिरोमणि आथेन्स, व रोम, यांचा तर जन्म देखील झाला नव्हता. अशा वेळी, आमची दयित- भूमिका, (प्राचीन भरतखंड, व अर्वाचीन हिंदुस्थान हें ), सर्व शास्त्राचें विश्रांतिस्थान, निगमविद्येचें माहेर घर, आणि ऐ- हिक सुखाचें केवळ इंद्रभुवन, होऊन राहिली. जिकडे तिकडे उद्यमशील लोकांनी केलेल्या प्रय- हिंदुस्थानचें ऐश्वर्य, आणि मानसिक उन्नति. मागील पृष्ठावरून पुढे चालू. A and concentration of reflection upon the fundamental cause of things, necessarily implying a long period of philosophical research in a precoding age. This is borne out by the old renown of Indian wisdom, by the reports of the companions of Alexander as to the Indian gymnasophist's &c. " ( The History of Indian literature. By Professor Weber. P. 27.)