पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ भारतीय साम्राज्य. [ भाग नद्या, पर्वत, इत्यादि भूगोलविषयक स्थले, आणि त्यांची नांवें, कालांतरानें पारदेशिंकानी तत्संबंधी जे लेख लिहिले त्यांच्याशीं, बिलकुल मिळतीना. किंवा, परकीयांनी समक्ष पाहिल्याची अथवा ऐकिल्याची, जी आमच्या देशाची व आमच्या लोकांची प्राचीन ऐतिहासिक माहिती दिली आहे, तिच्याशी वेदग्रंथांतील हकीकतीचा मुकाविला कोणत्याही प्रकारें पडतांना. आणि उपलब्ध असलेल्या सामग्रीत जर सर्व प्रकारें साद्यंत मेळ मिळत आहे तर, वेद, रामायण, महाभारत, इत्यादि ऐतिहासिक लेख आहेत, असे मानल्याशिवाय गत्यंतरच नाहीं. इतकेंच नाहीं तर, या संस्कृत महोदधीला कूटरचनो म्हणणें म्हणजे जाणून बुजून वेड्याचें सोंग घेणे होय. १. शिकंदरची स्वारी भरतखंडावर झाल्यावेळीं, ग्रीक लोकांनीं लिहिलेली हकीकत. २. They are names that have mostly a meaning in Sanskrit, they are names corresponding very closely to their Greek corruptions, as pronounced and written down by people who did not know Sans- krit. How is a forgery possible here ?

" Other conjectures have been made with even less foundation than that which would place the ancient poets of India under the influence of Babylon पुढे चालू.