पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग डयुगल्ड स्टयुबर्ट नामक दुसरे एक पाश्चिमात्य शिरोमणी आहेत त्यानी तर आप- युगल्ड स्ट यांचे संस्कृतमंथसंपत्ति ल्या विद्वत्तेची, आणि गहनजानाची, संबंधी जिन्हाचा पत्य. अगदी कमालच करून सोडली. त्यांची तार्किकशक्ती, व विवादकुशलता, हीं पाहिलीं झणजे तर कोणालाही हसूं आल्याशिवाय राहणारच नाहीं. हे गृहस्थ असे ह्मणतात की, सर्व संस्कृत भाषा, आणि त्यांतील अखिल काव्यभांडार, व गद्यपद्यात्मक नानाविध शास्त्रोदधि, हीं यच्चावत हिंदु कवि, ग्रंथकार, व शास्त्रवेत्ते, यांच्या बुद्धिप्रभावानें मूळची किंवा यादृच्छिक झालेली नसून, ती सर्व आह्मां ब्राम्हणांची पश्चात्ची कूट-रचना आहे. वाहवा !!! काय नामी आणि सयुक्तिक कल्पना ही ! ! ! हिला मान डोलविल्याशिवाय कोणाच्यानेही कसे राहवेल? कल्पना करा कीं, जो वेद अति पुराण असल्याविषयी सर्व जगाची कबुली व संमती आहे; जी संस्कृत भाषा सर्वो- त्तम असल्याविषयी सर्व देशाचे नामांकित विद्वान् मोठ्या प्रेमानें मान डोलवितात, व सकौतुकाश्चर्य करतात; ज्या भाषेतील नानाविध शास्त्रोदधि अपरंपार भरलेला असल्यामुळे, त्यांतच बुडून राहण्याविषयीं पाश्चिमात्य पंडित उत्कट लालसा दाखवितात; ती संस्कृत विद्या केवळ मिथ्यालेख असल्याबद्दल, अकटोपासून विकटो-