पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ भारतीय साम्राज्य. [ भांग परंतु तसेही बिलकुल नाहीं. बाबिलनमध्यें सौरमान असे, आणि आमचें तर चांद्रमान होतें. तेव्हां त्या देशां- तून ह्या ज्योतिर्विद्येचे आह्मी ऋण संपादन केलें, ही कल्पनाच ठरत नाही. आतां, अरबस्थानापासून आह्मांस है ऋण प्राप्त झाले असे म्हणावें तर, आरबांचे अठ्ठावीस मंझील, किंवा नक्षत्र, अथवा तारासमूह होते. इतकेंच नाही तर, उलट आरंबच आमचे सर्वतोपर ऋणीअसून, ज्योतिर्विद्या, औषधिविद्या, वगैरे नानाविध शास्त्रांत त्यांस आमचेच गुरुत्व असल्याविषयीं त्यांस कबूल करणे भाग पडेल; व तें अनेक प्रमाणांवरूनही निःसंशय सिद्ध होतें. आतां, चिनी लोकांचे आम्ही कित पत ऋणी आहों, याचाच फक्त विचार करावयाचा राहीला. प्रथमतः एवढेच ज्ञान संपादन करण्याकरतां आमचे लोक चीन देशांत गेले असल्याचें संभवत नाहीं. तशांत- ही ते गेले होते, म्हणून जरी क्षणभर कल्पना केली तरी, त्या गोष्टीला आधारभूत प्रमाण कोणतेच मिळत नाहीं. कारण, जर हिंदुलोक तिकडे गेले असते तर, त्या १ They had a division of the ecliptic into twenty seven and twenty eight parts, suggested evidently by the moons period in days, and seemingly their own ; it was certainly borrowed the Arabians. " ( Cole brooke.)