पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१वा ] ज्योतिःशास्त्र . पुढे कालवशात् इ० श० पूर्वी ३२७ वर्षांनंतर शिकंदरानें जेव्हां हिंदुस्थानावर स्वारी केली तेव्हां, हिंदु व ग्रीक राष्ट्रांचें संमिलन होऊन, त्यां परस्परांत हरतऱ्हेचें दळणवळण सुरू झाले. त्यामुळे आपापसांत ज्ञानाचा मोबदला होऊन, त्या प्रका- शानें हिंदूंनी आपल्या ज्योतिःशास्त्रास चलन दिलें. आणि त्याचे त्यांनी शास्त्रीय पद्धतीनें अन्वेषण आरंभिलें. तेव्हां अर्थातच त्याला पाहिजे होती तितकी सूक्ष्मता आणि यथार्थ व्यापकता प्राप्त होऊन, त्यास आपोआपच सतेजता आली. इतका फायदा ह्या यावनिक कालांत, केवळ ग्रीक ( यवन ) लोकांच्या सहवासाने झाला. तथापि, या पाश्चिमात्य लोकांच्या ज्ञान- दीपावर हिंदूंनी आपल्या अपूर्व कल्पनासामर्थ्यानें, व हिंदूंची ज्ञानोन्न- बुद्धिप्रगल्भतेनें छाप बसवून, आ- त्ति व उत्कर्ष आणि पला यशोदुंदुभि आशिया आणि तत्संबंधीं पाश्चिमा- युरोपखंडांत सर्वत्र गर्जविला. व त्या- त्यांचे अभिप्राय योगानें त्यांची दिगन्त कीर्ति झाली. याविषयीं प्रोफेसर वेबर असे लिहितात की, हिंदूज्योतिःशास्त्रां- चें चलन. And accordingly we find that they turned these Greek aids to good account; rectifying, in the first place, the order of their lunar asterisms, which was no longer in accordance with reality, so that 66 1