पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ भारतीय साम्राज्य. बराच शतकें अगोदर, ज्योतिः शास्त्रांत आमचा प्रवेश झाला होता. आतां, ग्रीक ज्योतिःशास्त्राचें आदि- कथन कोठे आढळतें, याविषयीं शोध केला तर असें कळून येतें कीं, ग्रीक लोकांनीं आर्गो नामक गलबतांत बसून सोनेरी लोंकर पैदा करण्याकरतां, काळ्या समुद्रा- च्या पूर्वेस कोल्किस नामक देशावर जेव्हां स्वारी केली, तेव्हां त्याचें दिग्दर्शन झाल्याचे दिसतें. आणि ही गोष्ट इसवी शकापूर्वी सुमारें बाराव्या किंवा तेराव्या शतकांत घडून आली असावी, असा अजमास आहे. हिंदूंत अति पुराण ज्योतिषी ह्मटला म्हणजे पराशर- असून, त्याची तशीच ख्यातीही आहे. त्यानंतर दुसऱ्या शेजेचा पुराणज्यो- तिषी गार्ग नामक ऋषि होय. तद- नंतर असुरमय, आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, आणि भास्कराचार्य, असे फार नामांकित पैकीं ज्यो- तिषी होऊन गेले. पराशर हा. इ. श. पूर्वी चवदाव्या शतकांत झाला असून, भास्कर हा इ.स. १९५० सालीं उदयास आला. पुराण ज्योतिषी पराशर. [ भाग वैदिक कालांतील ज्योतिर्विद्या प्रथमतः हिंदूंपासूनच पाश्चिमात्य राष्ट्रांस प्राप्त झाल्यावर, कालान्तरानें ग्रीक लोकांचें त्या शास्त्रांत बरेंच पुढे पाऊल पडलें. यावनिक कालो- तील ज्ञानप्राप्ति.