पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग: सूर्य स्वयंप्रकाश आहे की नाहीं, अशाविषयीं आधु- निक पाश्चात्य विद्वानांत बरीच चळ- सूर्यप्रकाश, व त्या- चीं कारणें. वळ सुरू असून, विशेष शोधाअंतीं तो स्वयंप्रकाश नसल्याबद्दल, त्यांचें मंत होत चालले आहे. शिवाय, ते अशीही कल्पना करि- तात की, सूर्याचें वातावरण ज्योतिर्मय असल्या कार णानें तो दीप्तिमान भासतो. आतां प्राचीनकाळीं, एतद्विषयीं, आर्यहिंदूंचे कशा प्रकारचे शोध होते, याबद्दल विचार करूं. अद्भुतसाग- रांत एके ठिकाणी असे विवेचन आहे कीं, “ भानोर्वा- युर्वेष्टनं प्रखरतेजोयुक्तम् । " म्हणजे सूर्याचें वातावरण प्रखर तेजानें युक्त आहे. त्यावरून फार पुरातन काळीं देखील आमच्या पूर्वजांनीं अति परिश्रमानें मोठमोठे व गहन शोध लाविले होते, असे दिसतें. धूमकेतूंचा देखील हिंदूंनी फारच बारकाईनें शोध लाविला होता; आणि त्यांत ते चिनी व इंग्र जादि पाश्चात्य, यांच्याही पुढे सर- सावल्यासारिखे दिसतात. चिनी लोकांनी एकंदर तीनशें धूमकेतूंची संख्या दिली असून, इंग्रज लोकांच्या अगदी नूतन शोधावरून ते सुमारें शांवर असल्याचे कळून येतें. परंतु हिंदु ज्योतिष्यांची धूमकेतु, व तत्सं बंधी शोध.