पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२वा ] ज्योतिःशास्त्र. ७५ आणि जल, ह्यांच्यांशी संयोग पावून, मेघाच्छादित आकाश असतां, जी चमत्कृति दृष्टीस पडते, तेच इंद्रधनुष्य होय. “ रविकिरण जलदमरुतां संघातो धनुखिस्थितो धनुर्मघोनः । असें काश्यप ह्मणतो. ह्याचा भावार्थ इतकाच कीं, सू- र्याची किरणें हीं, वायु आणि मेघ, यांच्यांशीं मिश्रित झाल्या कारणानें, स्थलांतरावर जी धनुष्याकृति दृष्टीस पडते, तिलाच इंद्रधनुष्य ह्मणतात. हें इंद्रधनुष्य जसें दिवसा पडतें, तसेंच रात्रीं देखील पडतें. दिनेच रात्राविंद्रधनुर्द्वावद्भुतौ । मणजे दिवसा आणि रात्री जी इंद्रधनुष्य पडतात, तीं दोन्हीं फारच अद्भुत असतात, असे अद्भुतसागरांत वर्णन केले आहे. रश्मिदंड. इंद्रधनुष्याप्रमाणेच रश्मिदंडही पडतो, आणि तो पढ- ण्याचें कारण देखील इन्द्रधनुष्यासा- रिखेच असते. मात्र इन्द्रधनुष्य कोण- त्याही स्थळीं पडतें, व रेश्मिदंड हा दिशांच्या मधोमध, आणि आकाशाच्या मध्यभागीं, पूर्वपश्चिम किंवा दक्षिणोत्तर, असा पडतो. तथापि, हा रश्मिदंड क्वचित्च दृष्टिगोचरे होतो. १ रविकिरण जलद मरुतां सन्निपातो नभे दंडवद्ररश्मिदंडः । इन्द्रधनुवदूरश्मिदंडः । ३ रश्मिदंडाः क्वचिद् दृश्यंते ।