Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२वा
ज्योतिः शास्त्र.

69


बरींच शतकें अगोदर, ग्रहांचें अवलोकन होऊन त्यांचे वेधही त्या प्राचीन ऋषींनी वेळोवेळी घेतले असावेत, या विषयीं कांहीं संशय नाही. त्यांनी एका वर्षाचे ३६० दिनविभाग कल्पून, प्रत्येक पांच वर्षांस एक अधिक मासाची योजना केली होती. व हे त्यांनी काढलेलें वर्षकालमान बहुतेक अंश खन्या प्रमाणाचें होतें. याशिवाय कांहीं स्थिर ग्रह, व चंद्राची गति, आणि सत्ता- वीस नक्षत्रें, हीं देखील त्यांनी शोधून काढली होतीं. आतां, सदरहू नक्षत्रें इसवी शकापूर्वी १४७२ वर्षांपासून तों ५३६ वर्षांच्या दरम्यान शोधून काढली असावी, असें प्रोफेसर वेवरचें ह्मणणे आहे. तैत्तिरीयसंहितेत सत्तावीस नक्षत्रांचीं नार्वे दिली असून, वाजसनेयिसंहि सेंत आणि छंदोग्योपनिषदांत तारा प्रेक्षक " व
" ज्योतिःशास्त्र ” यांचा नामनिर्देश केल्याचें आढळून येतें.
 वैदिक कालानंतर इसवी शकापूर्वी ३२७ व्या वर्षी, त्याची वृद्धि व शिकंदर बादशहाने हिंदुस्थानावर यावनिक काळ. स्वारी केली. त्यानंतर ग्रीक लोकांबरो- बर हिंदूचें चरेंच दळणवळण पडल्या कारणानें, ग्रीक विद्येचा भरतखंडावर, कांहीं अंशानें अंमल पसरला. त्यामुळे प्राचीन निर्भेल अशा आर्यज्योतिर्विद्येत संकर होऊन यवन ( ग्रीक ) ज्योतिर्विद्यांकुर, व तत्संबंधी पारिभाषिक शब्द, यांचा आपोआपच प्रादुर्भाव झाला. तेव्हां अर्थातच,