Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९१वा ] वेदान्तशास्त्र. म्हणजे मिथ्या ब्रह्म असून, या जिवाचें आणि देहाचें मीपण धारण करणे, हे वंध्यासुतवत् मिथ्या आहे. म्हणजे मूळचें कांहींच नसून " मी आहे, " अशी कल्पना झाल्याने आत्म्याचें सच्चिदानंदस्वरूपावर अज्ञा- नाचें पडळ पडून, त्या अहंभावनेच्या योगानेंच हे सर्व नगत् खरें असल्याविषयीं लटका भास झाला आहे. आणि म्हणूनच “ अज्ञानमेवास्य हि मूलकारणम् ह्या रामगीतेतील वाक्याप्रमाणे अखिल सृष्टीचें मूल- कारण अज्ञान, म्हणजे अहंभाव माया होय. आणि हे बंधनमूलक अज्ञान जाऊन ज्ञान प्राप्त झालें, म्हणजेच मोक्ष प्राप्त होतो. कारण कीं, " ज्ञानादेव तु कैवल्यम्' हा वेदाचा परम सिद्धान्त असून, तो अनुभव सिद्ध, आणि निर्विवाद आहे. " 66 एकंदरीनें पाहतां, षड्दर्शनांतील मतांचें हेंच सार दिसतें कीं, देहभावनेच्या योगानें जो त्रिविधताप होतो तो हरेकप्रकारांनीं नाहींसा करून, मन ज्या ज्या साध- नांनी निर्विकल्प राहील त्या सर्वांची योजना करून, त्यास निरंतर शान्तिसागरांत ठेवावयाचें. " असो. याशिवाय निरीश्वर मतवाद्यांचीही नास्तिकदर्शनें आहेत. तीं मुख्यत्वेंकरून सात आहेत:- १ चार्वाकदर्शन; २ बौद्ध निरीश्वर वादी. दर्शन; ३ योगाचारदर्शन; ४ माध्यमिकदर्शन; ५ सौत्रां