पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०वा ] धर्मशाख. पात्र होऊं. कल्पना करा की, सदरीं निर्दिष्ट केलेल्या 'भारवाहकांनी' जर षडंगवेदांचे ओझें आपल्या जिव्हाग्रीं आज हजारों वर्षे वागविलें नसतें, तर हा आमचा अमूल्य षडंगवेद या पूर्वीच कोणीकडे कसा लयास गेला असता, याविषयीं कांहीं तरी पत्ता लागला असता काय ? जो वेदवृक्ष उत्तरोत्तर अति विस्तीर्ण होत गेल्यामुळे, त्याचीं मुळे थेट पातालास जाऊन पोहोंहलीं, व ज्याच्या अग्रशाखा आकाशांत अंतर्धान पावल्या, तोच वृक्ष मध्यंतरींच रसा- तलास गेला असता तर आमची काय दशा झाली असती बरें ? आमची मु ळची स्थिति, आमचा धर्म, आमचे आचारविचार, आणि आमचें बुद्धिवैभव, ( जीं केवळ पाहू- नच या भूतलांवरील सर्व राष्ट्र तोंडांत बोटे घालतात, ) तीं ह्या जगाला कळविण्याला यत्किंचित् तरी मार्ग राहिला असता काय ? खरोखर, वेद ठार बुडते तर, हिंदूंचें हिंदुत्व राहिलें नसतें. व आम्ही फारच शोचनीय दशेप्रत पोहों- चलों असतों. परधर्माची अनेक वावदळें आह्मांवरून जा- ऊन त्यांनी आम्हांस संत्रस्त केलें, तरी देखील परधर्मा- पासून आह्माला यत्किंचितही धक्का न पोहोचतां, आम्ही कायमच्या कायमच राहिलो आहों. हा प्रभाव केवळ वे दाच्या जबरदस्त कोटाचाच होय. व हा कोट आज हजारों वर्षे आमच्या नैष्टिक भटसंत्र्यांनी जोंबाळून ठेवून, त्यांचे आम्हांवर उपकार.