पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग पडानुपूर्व्या विमस्य क्षत्रस्यचतुरोऽवरान् । विशद्रयोस्तु तानेव विद्याद्धर्म्यानराक्षसान् ॥२३॥ ( मनुस्मृति अध्याय ३ . ) पहिल्या प्रकारच्या विवाहांत सालंकृत कन्यादान कर- तात. दुसऱ्यांत ज्योतिष्टोमादि यज्ञ त्यांतील भेदाभेद करून अलंकारासहित कन्या देतात. तिसऱ्यांत यागादि सिद्धीसाठी वरा- लमाचे प्रकार व ला गाय किंवा वृषभ देऊन कन्या अर्पण करतात. चव- थ्यांत " सहयुवां धर्म कुरुतम् | " असें म्हणून कन्या देतात. पांचव्यांत ज्ञातीला व कन्येला यथाशक्ति द्रव्य देऊन तिला वराप्रत देतात. सहाव्यांत कन्या आणि वर यांच्या परस्पर अनुरागानें आलिंगनमैथुनादिव्यवहार हो- तात. सातव्यांत बलात्कारानें कन्येचें हरण करून ति- च्याशी लग्न लावतात. आणि आठव्यांत कन्या प्रसुप्त, मदविव्हल, मद्यप्रमत्त, संरक्षणरहित, व विजनदेशांत अ सतां, तिला बलात्कारानें नेऊन तिच्याशीं पाप हेतूने विवाह होतो. आणि ह्मणूनच ह्या शेवटल्या प्रकारचा विवाह समुतिकारांनीं अति निंद्य मानला आहे. विवाह झाल्यानंतर, व गृहस्थाश्रमी बनल्यावर, घ्राम्ह- णानें प्रत्यहीं अध्यापन, वेदाध्यायन, ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, तर्पण, देवयज्ञ, भतयज्ञ, मनुष्ययज्ञ, होम आणि गृहस्थाचें प्रत्यहीं आचरण.