भारतीय साम्राज्य. [ भाग तदनंतरचा सूत्रकाल होय. व याच कालांत स्मृतींचा विन्यास झाला असल्याविषयी सर्वानुमतें ठरतें. ह्या कालाची व्याप्ति इसवी शकापूर्वी एक १००० हजार वर्षां- पासून तो इ० स० पू० ५४३ वर्षे असावी, असे वाटतें. मानव गृह्यसूत्रे, कात्यायनकृत कर्मप्रदीप, अप स्तंबकृत धमसूत्रे, शौनककृत प्रतिसांख्य सूत्रे, पार- स्करकृत कातीय गृह्यसूत्रे, अश्वलायन श्रौत व गृह्य- सूत्रे, सांख्य गृह्यसूत्रे, आणि बौध्यायन सूत्रे, इत्यादि- कांत धर्मशास्त्राची मूलतत्वें आढळून येतात. तसेंच गौतम, विष्णु, आणि वशिष्ठकृत धर्मशास्त्रांतही त्यांचें प्राचुर्य दिसून येतें. धर्मशास्त्रावर एकंदर लहान मोठें ग्रंथ एकशें बावीस असून, शिवाय आणखी चतुर्विंशति, षट्त्रिंशत्, सप्तर्पि, पडशीति, धर्मशास्त्रावरील ग्रंथ. पण्णवति, वगैरे स्मृतिसमुदायवाचक दूसरे ग्रंथ आहेत. मनु, याज्ञवल्क्य, पारस्कर, कात्यायन, कण्व, गौ- तम, शाण्डिल्य, जावालि, पाराशर, शंख, हारीत, नारद, बृहस्पति, संवर्त, कोकिल, गोभिल, सूर्या- रुण, लघुपराशर, वृद्धपराशर, लघुबृहस्पति, शौनक, वगैरे अनेक स्मृतिकार आहेत. परंतु त्या सर्वांत मनु हा शिरोभाग होय. लघु- सूत्रांचा काल, व स्मृतिविन्यास.
पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/१९
Appearance