Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०वां ] धर्मशाख. ह्मणतात. ह्या सर्वांचा शिरोभाग ह्मटला म्हणजे उपनिषदें होत. या उपनिषदांत ईशनिष्ठा, आणि तदंतर्गत सर्वे- क्यता, हीं ठायीं ठायीं व्यक्त होतात, हें जास्त सांगावयास नको. प्रत्येक वेदाची जशीं उपनिषदे आहेत, त्याप्रमा- र्णेच प्रत्येक वेदांची सूत्रेही आहेत; व त्यांत नीति, व्यव- हार, संप्रदाय, आणि आचार, इत्यादिकांचें थोडेंबहुत तरी विवेचन असतें. हींच सामाजिकस्थितीची सर्वत्र व्याकीर्ण झा लेली मूलतत्वें, मानवी कुटुंबाच्या व्यवस्थेसाठीं, व तीं सुलभ रीतीनें स्मृतीत राहवीं या हेतूनें, विद्वान् आणि दूरदृष्टी, अशा आमच्या ऋषींनी एकत्र केलीं, व त्यांसच स्मृति असे म्हणतात. ज्या विद्वन्मुकुटमणींनी ह्या स्मृति रच- ल्या, त्यांस स्मृतिकार असे ह्मणतात. स्मृतींची एकंदर त्यांची रचना, त्यांचा विन्यास, त्यांतील भाषा- पद्धति, त्यांत वारंवार दृष्टिगोचर होणारी वेदवचनें आणि त्यांचा उल्लेख, याविषयी पूर्ण विचार केला म्हणजे ह्या स्मृति वेदांनंतर निर्माण झाल्या, अशाबद्दल यत्किंचि तूही शंका राहत नाहीं. वेदांचा विन्यासकाल इसवी शकापूर्वी तीन असल्याविषयीं मागील भागांत सा- धंत विवेचन केलेले आहे. वेदकालानंतरचा ब्राम्हण व्यवस्था, वेदविन्यासकाल. ३००० हजार वर्षे काल असून, तो १४०० / १५०० वर्षांपासून तो इसवी शकापूर्वी १००० हजार वर्षांपर्यंत असावा असे वाटतें.