Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२वा ] ज्योतिः शास्त्र. मुळे गणितविद्येत चांगला प्रवीण झाल्यावर, त्यानें अनु- भव घेऊन अरिस्टॉटल्चीं कांही मतें खोटीं ठरविलीं; तेव्हां सर्व लोकांनी त्याजवर गिल्ला करून त्याचे फार हाल केले. व त्या हालांत तो इ० स० १६४२ सालीं मरण पावला. त्याच सालीं, न्यूटन् नामक प्रसिद्ध विद्वान् ज्योतिषी, इंग्लंडांत कोलस्तर्वर्थ गावीं जन्मला. यानें पृथिवीचें आकर्षण इत्यादि आर्य शोधांचें पुनरुज्जीवन केलें, व कांहीं नवीन शोधही लाविले. तदनंतर तो ३० स० १७२६ साली मरण पावला. न्यूटनचे मत. याप्रमाणे इसवी शकाच्या पंधराव्या शतकापर्यंत, युरोपांत सर्वत्र अज्ञानान्धकारच पसरला असल्यामुळे, लोकांच्या अडाणी समजुती जशाच्या तशाच राहिल्या होत्या. अशावेळी कोपर्निकस, ग्यालिलियो, न्यूटन्, यांचा उदय झाल्यामुळे, लोकांचें अज्ञान नाहींसें झालें, ही गोष्ट अभिनन्दनीय आहे. तथापि, पृथिवीचें सूर्यास- भोंवतीं परिवर्तन, सूर्याचें आकर्षण, ग्रहणाचें कारण, पृथिवीचें आकर्षण, इत्यादिसंबंधी त्यांनी नवीन शोध काढले अणु- न जे युरोपस्थांचें ह्मणणे आहे, केवळ मिथ्यावाद असून, त्यांनी फक्त देशांत पुनरुज्जीवन. हिंदुंनी फार प्राचीन काळीं लावि- लेल्या शोधांचे पुनरुज्जीवनच केलें, अर्से ह्मणण्यास हर- आर्यज्योतिर्विद्या, म तिचें पाश्चिमात्य .