पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४२१
मानवपुनर्घटना

घेतले तर प्रथम त्याची संपूर्ण योजना आंखणे, खर्चाचा अंदाज करणें, सामग्रीचे स्वरूप ठरविणे, तज्ज्ञ माणसें नमविणे, त्यांच्यांत कामाची वांटणी करणे ही कर्तृत्वाची पहिली कसोटी होय. यानंतर या योजनेप्रमाणे कार्य घडवून आणणे हे कार्यक्षमतेचे दुसरे लक्षण होय. त्यासाठी सतत जागरूक राहून अंतिम ध्येयाकडेच सर्व कायौंघ सारखा जात राहील अशी काळजी घेणें, भिन्न खात्यांत एकसूत्रता राखणें, शिथिलता, बेजबाबदारी यासाठी कडक शिक्षा करून असले दोष निपटून काढणें इ. गुणांची आवश्यकता असते. हे गुण म्हणजेच ही कार्यक्षमता आपण भारतीयांनी कितपत प्रगट केली तें आतां पहावयाचे आहे. गेल्या पांचसहा वर्षांत आपण ज्या निरनिराळ्या योजना आंखल्या त्यांची हकीकत मागें दिलीच आहे. त्या योजनांवर सरकारनेच तज्ज्ञांकडून जे अहवाल लिहवून घेतले त्यांच्या आधारानेंच आपल्याला आपल्या कार्यक्षमतेचें मापन करता येईल.
 १९४६ सालीं काँग्रेसने सत्ता हातीं येतांच 'प्रांतविकासयोजना' आंखली होती. चार वर्षांनी त्या कार्याचे परीक्षण करून त्यासंबंध अभिप्राय द्यावा, अशी डॉ. ग्यानचंद यांना सरकारने विनंती केली होती. त्यांनी जें निवेदन सादर केले आहे त्यावरून आपणा भारतीयांच्या ठायीं क्रियासिद्धीला लागणारे सत्त्व मुळींच नाहीं असे स्पष्ट दिसून येते. साधनसामग्री म्हणजे उपकरणे येथें विपुल आहेत असें नाहीं; पण ते सत्त्व जर आपल्या ठायीं असतें तर आहेत या साधनांच्या जोरावरच आपणांस सध्यांच्यापेक्षां दसपट यश मिळवितां आले असते असे दिसून येईल.

कार्यक्षमता

 डॉ. ग्यानचंद यांनी या योजनांच्या कार्यवाहीतील पहिला दोष दाखविला तो हा की, अखिल भारत डोळ्यापुढे ठेवून त्यांची आंखणी झालेली नाहीं. प्रत्येक प्रांताचे हितसंबंध जणुं निराळे आहेत असें धरून, किंवा कसलाच विचार न करता, या योजना ठरविल्या गेल्या आहेत. नवीन रस्त्यांची बांधणी पंजाब व बंगाल या प्रांतांत होणें अवश्य होते. पण या प्रांतांत रस्त्यांवर एकदोन कोटीच खर्च झाला असून उत्तर प्रदेशांत मात्र