पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१५
भारतीय लोकसत्ता व समाजवाद

गुजरात किंवा महाराष्ट्रांत जेथे रयतवारी पद्धत होती, तेथे शेतकऱ्यांनीं करबंदी करणे काँग्रेसला मान्य होते. कारण ती चळवळ सरकारविरुद्ध होत असे; पण संयुक्तप्रांत किंवा बंगाल येथे जमीनदारी पद्धत असल्यामुळे तेथें शेतकऱ्यांनी करबंदी करणे म्हणजे ती चळवळ जमीनदारांविरुद्ध होणार ! अर्थात् ती काँग्रेसला मान्य होणे शक्य नव्हते. पंडितजी म्हणतात, कुळांनी खंड नाकारला कीं पहिला धक्का ताबडतोब जमीदाराला बसून वर्गकलहाच्या स्वरूपाचा प्रश्न उद्भवणार होता. काँग्रेस ही राष्ट्रीय संस्था होती. वर्गकलह उत्पन्न करण्याची अथवा जमीनदार- वर्गाला दुखविण्याची काँग्रेसच्या पुढाऱ्यांस फार भीति वाटत असे. म्हणून कायदेभंगाच्या पहिल्या सहामाहीत परिस्थिति अनुकूल असूनहि करबंदीची घोषणा करण्याचं त्यांनीं टाळले. अशा तऱ्हेनें वर्गकलह उत्पन्न करण्याची मला भीति वाटत नव्हती. परंतु काँग्रेसचे स्वरूप लक्षांत घेतां वर्गकलहाला उत्तेजन देणे शक्य होणार नहीं हें मी जाणून होतो.

काँग्रेसमधील तट

 हळूहळू काँग्रेसचे नेते व पंडितजी यांच्यांतील मतभेदाला तीव्र व कटु असें रूप येऊ लागले. 'माझ्या समाजवादी मतप्रचाराच्या परिणामाकडे पाहून वर्किंग कमिटींतील माझे कांहीं सहकारीसुद्धां बिथरले. गेली कित्येक वर्षे माझ्या मतप्रचाराकडे त्यांनी कानाडोळा केला होता. पण आता माझ्या कार्यामुळे वरिष्ठवर्गीय लोक दशहत खाऊं लागल्याने माझ्या मतप्रचारांचे रूप निरूपद्रवी राहिले नाही. यामुळे काँग्रेजनांचा मजवर रोष झाला. परंतु मी तरी काय करणार ? मी ज्या कार्याचे महत्त्व अत्यंत मोठें समजत होतो ते मी अंगाबाहेर टाकावे की काय ? काँग्रेससंबंधी माझे कर्तव्य व माझी तत्त्वे यांत विरोध उत्पन्न झाल्यावर जागेचा राजीनामा देऊन बाजूस सरणे समुचित ठरले असतें.' या उताऱ्यांतल्यासारखी राजीनामा देण्याची भाषा आत्मचरित्रांत अनेक ठिकाणी दिसते. यावरून काँग्रेसचे नेते व पंडितजी यांच्यांतील भेद किती मूलगामी स्वरूपाचा होता हें कळून येईल. काँग्रेसच्या जुन्या मतप्रणालीचे मुख्य आधारस्तंभ म्हणजे महात्माजी. ते समाजवादाला अनुकूल झाले असते तर या भूमींचें भवितव्य सध्यांपेक्षां फारच निराळे