पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१००

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९९
भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता

शकलें झालीं. १९२१ नंतर डॉ. सन्यत्सेन यांनीं आपल्या कुओमिंटांग पक्षाची पुन्हां संघटना केली व तेव्हांपासून मात्र त्यांनी देशांतल्या खऱ्या शक्तीला आवाहन करण्यास प्रारंभ केला होता. पण १९२५ सालीं ते कालवश झाले आणि त्यांचा वारसा चिआंग कैशेक या लष्करशहाकडे गेला.

लोकशक्ति-टिळकांची दिव्यदृष्टि

 १८६० ते १९२० या कालांतील जगांतील उदयोन्मुख राष्ट्रांच्या नेत्यांचे ध्येयधोरण काय होते ते आपण येथवर पाहिले. त्यांपैकी कोणींहि आपल्या भूमींतील खऱ्या शक्तीची उपासना केली नव्हती. किंबहुना दीन, हीन, अज्ञ, दरिद्री, मुकी अशी भोवती पसरलेली जी जनता तिच्यांतून कांहीं एक अद्भुत सामर्थ्य निर्माण होऊ शकेल हें आकलनच त्यांना झाले नव्हते. या शक्तीचे दर्शन व्हावे अशी दिव्यदृष्टि त्यांना प्राप्तच झाली. नव्हती. भरतभूमीचें अलौकिक भाग्य हें कीं तिच्या एका सुपुत्राला जनशक्तीच्या या सुप्त सामर्थ्याचे दर्शन प्रारंभापासूनच घडत होते आणि या ध्रुवताऱ्यावरून त्याची दृष्टि शेवटपर्यंत कधींहि विचलित झाली नाहीं. केसरीच्या दुसऱ्या वर्षाच्या एप्रिल-मे च्या अंकांतच देशांतल्या खऱ्या शक्तीचा निर्देश टिळकांनी केला आहे. ते म्हणतात, 'इतक्या दिवसांच्या गाढ निद्रेतून अंमळ डोळे उघडून पहाण्याची मनीषा आम्हांला होऊं लागली आहे; परंतु सार्वलौकिक मत म्हणून जो एक नियामक अद्भुत उपाय आहे- ज्याला जुलमी राजे व अहंपणाचा तोरा बाळगणारे मंत्रीहि भितात- तशा तऱ्हेचें मत आपल्यामध्ये अजून उत्पन्न होऊं लागले नाहीं.' राजसत्तेला जो शह द्यावयाचा तो दहशतवादाने किंवा देशांत असलेल्या सैन्याच्या बळानें द्यावयाचा नसून लोकमताने द्यावयाचा, हें या वेळेपासूनच टिळकांचें ठरीव धोरण आहे. 'लोकांचा धाकवचका नसल्यामुळे राजे प्रजेस पीडादायक होतात' असे सांगून 'स्वदेशभक्तिजन्य जुटीनेच हा धाकवचका राजांना बसेल' असे 'जूट' या निबंधांत त्यांनी सांगितले आहे. १९०१ सालीं शेतकऱ्यांचा जमिनीवरचा हक्क नष्ट करण्याचा एक प्रस्ताव सरकारने संमत करून घेतला. त्या वेळीं, आमचे लोकमत निर्बल असल्यामुळेच हें घडूं शकतें, असें टिळकांनीं लिहिलें. त्या वेळीं त्यांनी सैन्याला, सरदार