पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ भारतीय रसायनशास्त्र, [प्रकरण ( २ ) एके दिवशी रत्नघोच म्हणून एक लबाड शिष्य आला त्याने धन वगैरे न मागतां रसावंद्येची गुरुाकली मागितली. ( ३ ) तेव्हां नागार्जुनाने आपण बारा वर्षे तपश्चर्या करून वटयक्षिणी कशी प्रसन्न करून घेतली, व तिच्या प्रसादाने व ओळखीने लक्षांचा पोषक जो शालिवाहन राजा याची गांठ कशी पडली, व त्याच्या साहाय्याने रससिद्ध कशी करून घेतली, हे सांगितले या नागार्जुनाच्या रस सिद्धीस, वसिष्ठाने मांडव्यास शिकावलेले बष्ठिमांडव्यशास्त्र फारच उपयोगी पडले. हे शास्त्र नागार्जुन आपल्या गुरूजवळ पढला. राजा शालिवाहनाने सुवर्णरत्नभांडार, आपली कुमारी, आपली मदसुंदरी भार्या व स्वत: आपण आपल्या सेवेस हजर हो, झगून वटयक्षिणी स सांगितले; मग मांडव्याच्या शास्त्राच्या आधाराने सिद्ध नागार्जुनाने रस सिद्ध केला, | ( ४ ) पुढे रत्नघोच त्याविद्येत त्याचा शिष्य झाला. या मांडव्य व रत्नघोषांचा र. र. स. कयौनी रससिद्धांमध्ये उल्लेख केलेला आहे. वासष्ठाने मांडव्यास रसशास्त्र व ज्योतिषशास्त्र ही दोन्ही शिकविली, याच रसासद्ध मांडव्याचा उल्लेख, वाचस्पतिमिश्राने पतंजलिसूत्रांतील ( योगाच्या) कैवल्यपादाच्या सूत्रावर टीका करितेवेळी असा केलेला आहे. इलैब वा रसायनेपियोगेन । यथा मांडग्यो शुनिः रसोइयोद् विंध्यवाली इति । | पातंजलदर्शन. विद्यासागरीप्रत पृ. १८० यावरून मांडव्यमुनि हा रसासह विंध्यपर्वतावर रहात असे हे कळूनयेते. लोकनाथ विभूचा श्लोक ५८५ मध्ये एका पोटलिका विधाना' चा कर्ता ह्यणुन उल्लेख आलेला आहे. या लोकनाथाचा र. र. स. कत्यनेही उल्लेख केलेला आहे. याने रसेंद्रमंगल नांवाचा ग्रंथ लिहिल्याप्रमाणे वाटते. हा रसैद्रुमंगल ग्रंथ समंगलाहून अगदी भिन्न होय ! रसाल ग्रंथ शंकराच्या नांवावर प्रसिद्ध आहे. कांहीं रसयोगाने दीर्घायु होण्याचा प्रयोग मार्कडेयाचा ह्मणून उतरू. न घेतलेला आहे ( श्लो. ४८५ ). श्लोक ५३८ मध्यें वार्तिकांचाही