पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ वे ] नित्यनाथसिद्धाचा रसरत्नाकरपंथ. ५९ च्या सुमारास होऊन गेला; रसवाग्भट हा १३००-१४०० च्या दरम्यान होऊन गेला; याहूनहीतो अलीकडचाच होईल, शिवाय मागे जाऊ शकत नाहीं. रसवाग्भटाने र. र. स. च्या प्रारंभों रससिद्धांची एकद, नांवे देऊन पुन्हा: साहव्या अध्यायांत कां दिली याचा अतां उलगडा होतो. हा संपूर्ण अध्याय वादिखंडातून उतरून घेतलेला आहे; उतरून घेतलेल्या भागांत रससिद्धांची नांवे ही आलेली होती ती ही रसवाग्भटाने पुन्हाः उतरून घेतली ! याप्रकारे सहाव्या अध्यायांत रसवाग्मटाने दिलेली रससिद्धांची नांवें मूळ नित्यनाथाच्या वादिखंडांतील होत ! पाहिल्या अध्यायांतील नावांत व या नांवांत कित्येक ठिकाणीं कां फरक पडतो. हे आतां कळून आले. या दोन्ही यादी भिन्न भिन्न ग्रंथांवरून रसवाग्भटाने उतरून घेतलेल्या आहेत हे आतां उघड झाले. असो. वादिखेडाच्या प्रारंभीं नित्यनाथाने अशी प्रस्तावना लिहिली आहेः नत्वा श्रीपार्वतीदेवी नत्वा श्रसिद्धों तथा ॥ { रसरत्नाकरं वक्ष्ये देहे लोहे शिवंकरं ॥ २ ॥ शिववीर्य सूतराजः पारदश्च रदकः ॥ । एतानि रसनामानि तथान्यानि, शिवे यथा ॥ ३ ।। इते शिवपदं सिद्धं साधकानां महोत्सवे ॥ शिववीर्य तथारव्यातं सदसिद्धि प्रदायकम् ॥ ४ ॥ यतः पराशवात्सूतं तेन सूतं शिवोदितं ॥ * संसारस्य परं पारं दत्तेसो पारदः स्मृतः ॥ ५ ॥ रस : करात लोहानि देहाश्चा ( हैं चा ) पि उसेवनात् ॥ रदस्तेन विपातो द्रवत्वाच्च रसः स्मृतः ॥ ६ ॥ रसशास्त्रेषु सर्वेषु शंभुना सूचितं पुरा ॥ * हा श्लोकाध श्रीमाधवाचार्यांनी आपल्या सर्वदर्शनसंग्रहातील रसेश्वरदर्शनांत उतरून घेतलेला अाहे. ( पहा, आनंदाश्रम प्रत, पृ. ८०, ओळ ५ वी.) यावरून रसरत्नाकर व त्याचा कर्ता नित्यनाथ हे माधवाचार्याहून प्राचीनतर ठरतात, मृणजे, इ. स. १३५० पूर्वी ५० । ७५ वर्षे तरी नित्यनाथ होऊन गेला असला पाहिजे. ह्मणजे १२५०-१३०० च्या जवळजवळ नित्यनाथ होऊन गेला. त्याने चर्पटीचा उल्लेख केलेला असल्यामुळे याहून पूर्वी तो जाऊ शकत नाहीं. -