पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थें.1 धातुवाद खरा आहे ! ( ४ ) एकाच पायांत एकदां एक भस्म घातल्याने रुपें होतें, व (५) दुस-या वेळी त्यांतच दुसरें भस्म घातल्याने सोने होते. | ( ६ ) यावरून; सोने व रुपे यांतील मूळ-पदार्थ पारा हा एकच आहे, व (७) सुवर्णत्व व रूप्यत्व आणण्यासाठी मात्र बाहेरील थोडीशी उपाधि कारणीभूत आहे. (८) ही उपाधि कळली असतां आपणांलाही सोने व रुपे बनवितां येणे शक्य आहे. ( आज आपणांस ती उपाधि माहीत नाहीं, तो भाग वेगळा ! ) (९) पारा रंजित व बद्ध ज्यायोगे होतो, ते भस्मरूप पदार्थ होते. पाश्चात्य उपपत्ति. स्वानुभवाने जे सिद्धांत किंवा जी उपपत्ति आह्मीं बसविली, तेच सिद्धांत व तीच उपपत्ति पाश्चात्य रसवाद्यांनी बसविली आहे. आठव्या शतकांतील मध्यभागांत होऊन गेलेल्या गेवर नांवाच्या (Geber ) एका आरबी रसवेत्त्याविषयी व त्याच्या मताविषयीं असे लिहिले आहे « He thought that metals were all equally composed of mercury, arsenic and sulphur, and that in the descending scale from gold to lead, mercury, arsenic and sulphur were each present in a greater or less degree of purity in proportion to the color and quality of each metal.” | गेबरच्या मताप्रमाणे प्रत्येक धातूंत पारा, सोमलधातु व गंधक ही तिन्हीं असतात. रंगाच्या व गुणांच्या मानाने प्रत्येकांत हे तिन्ही पदार्थ कमीजास्त मानाने असतात, असे तो ह्मणतो. आमच्या निदर्शनास एवढेच सध्यां आले आहे कीं, रुपे व सोने यांजमध्ये सारखाच पारा आहे. बाकीच्यांत असल्याविषयी माहिती नाहीं; कारण बैराग्याने त्या पान्यांत कशाचीं भस्में घातलीं। हे अज्ञातच आहे. एक एक गुंजे भस्माशिवाय, -॥- भार रुप्यांतील व --- भार सोन्यांतील बाकीचा सर्व भाग पाराच होता. यावरून बहुतेक भाग ( रुपें व सोने यांतील ) पाराच आहे एवढेच समजून येते. फक्त पान्याला रंगवून घट्ट कसा करितां येतो हाच यांतील प्रश्न दिसतो,