पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९०' भारतीय रसायनशास्त्र. प्रकरण ४५ वें: * उतारे व टिपणे. *

सोमदेवाचा रसेंद्रचूडामणि. (?) याची हस्तलिखित प्रत मला दे. माधव शंकर सोहनी यांजकडून मिळाली, तीवर कत्र्याचे अगर ग्रंथाचे नांव नाहीं; परंतु रसरत्नसमुच्चयाच्या कांहीं प्रास्ताविक अध्यायांची व याची तुलना करितां, हा सोम देवाच्याच ग्रंथाचा त्रुटित भाग असावा अशी खात्री होते. र. र. स. कराने सोमदेवाच्या ग्रंथांतून पुष्कळच. उतारे घेतलेले आहेत. सोमदेवाच्या ग्रंथाचाच हा भाग आहे असे ऋणण्याला या दोहोंची तुलना हुँच मुख्य कारण आहे. याचे मूळ, हस्तलिखित प्रत व र. र. स. या दोहवरून पाठभेद देऊन यांत दिलेले आहे ते रसशास्त्राची प्रस्तावना यादृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे; यायोगें र. र. स. च्या पहिल्या अकरा बारा अध्यायांवर चांगला प्रकाश पडतो, व कित्येक कठिण भाग ( र. र. स. च्या छापील प्रतीतील ) सुगम होतात. एकंदरीत या बाडाचे बरेच महत्व आहे ह्मणून येथे दिलेले आहे. श्लोकसंख्या मुळांत नाहीं; मीं । दिलेली आहे. प्रत्येक भागाचा प्रारंभ नवीन प्यारीग्राफने केलेला आहे; तरी लोकसंख्या तशाच पुढे चालविली आहे. हस्तलिखित प्रतीचा लांबट पत्रे असून मजकूर चार बोट रुंद व पंधरा बोटे लांब आहे. अक्षर बारीक व वळणदार असून काळ्या भोर शाईने चांगले लिहिलेले आहे. प्रत्येक पृष्ठाच्या एके बाजूच्या पत्रावर सुमारे १९/२० श्लोक आहेत. याप्रकारे ८ पृष्ठे ह्मणजे १६ पत्रे आहेत. यांतील हस्तलेखाच्या चुका उघड असतील तेथे शुद्ध केलेल्या आहेत. उघड नसतील तेथे, अर्थ कळत नसल्यास, कॅसांत (१) याप्रमाणे प्रश्नचिन्ह घातलेले आहे. कंसातील सर्व मजकूर मूळांतील नसून माझाच आहे असे समजावे. पाठभेद वगैरे र. र. स ग्रंथांतून घेतलेले आहेत. टिपांतील आंकडे लोकांना