पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ भारतीय रसायनशास्त्र, या लोकांवरून व अध्यायाच्या अंतांवरून पहातां, हा ग्रंथ बिंदुपंडित नांवाच्या भिषग्वराने लिहिल्याचे दिसते या ग्रंथांत पा-यावरचे आठच संस्कार वर्णिलेले आहेत. माधवाने आयुर्वेदप्रकाशांत रसपद्धतींतील अनेक उतारे घेतलेले आहेत. रसमार्ग व रसपद्धति हे एकच की भिन्नहोत याबद्दल निर्णय करितां येत नाहीं. प्रकरण ४३ वें। * पारदभस्मकल्पना * हा ग्रंथ मागें सांगितल्याप्रमाणे तुळजापूरचे वैद्य बाबाजी दाजी कदम याचेकडून मिळाला. हा पारदभस्म करण्यासंबंधी अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. याची रचना गौडज्ञातीय मुरारीचा पुत्र उपाध्यादेव ( मुरारिसुनु उपाध्याय देवेन विरचिता ) याने केलेली आहे. याचे एकंदर ६५६ शोक आहेत. या ग्रंथास मंगलाचरण वगैरे कांहीं नाहीं. कशा प्रकारच्या पाण्याचे मारण करावे हे मात्र उत्तम रीतीने सांगितलेले आहे; ते असेः सदोषोभस्मितो येन कृत्वा योगं सुकर्मणी ।। संस्कारेण विना कृत्वा सूतस्य (श्च ?) मारित तिरः (१)॥४॥ स पतेन्नरके घोरे यावत्कल्पविकल्पनम् ॥ अजीर्ण तु अबीजं तु सूतकं यस्तु घातयेत् ॥ ७ ॥ ब्रह्माहा स दुराचारी मम द्रोही महेश्वरि ! ॥ तस्मात्सर्वप्रयत्नेन जारितं शोध्य (शुद्ध) मारयेत् ॥ ८ ॥ अभ्रकं द्रावितं येन भस्म चेत्पारदं कृतम् ।। द्वारमुद्धाटतं तेन यमस्य धनदस्य च ॥ ९॥ यै र्नि (?) भस्म कृतः सूतः भस्मितो योगकर्माणि ।। तैनरैः प्राप्यते सौख्यं धनदारा सुतादयः ॥ १० ॥ सारांश, आठ संस्कारांनीं शुद्ध अशा पाण्यामध्ये गंधक किंवा, अभ्रक यांचे जाणार करून, नंतर त्याचे बीजयोगें (ह्म० सुवर्णयुक्त करून) मारण कारावे. सदोष पारदाचे भस्म करू नये. अभ्रकाची शुद्धि व पाण्याचे भस्म ही फार महत्वाची आहेत. यांनीं कुबेर व यम यांची द्वारे उघडतात. अणून ही दोन्ही करण्याचा माणसांनीं यत्न करावा. या ग्रंथांत पारदभस्माचे अनेक प्रयोग आहेत.