पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तसें [ करितों ]. तो म्हणाला मी तुमच्याजवळ वर मागतों. ते म्हणाले मार्ग. तेव्हां पशंचें आधिपत्य [ मला असावें] असा वर त्याणे मागितला. म्हणून त्याचें पशुमान हे नांव. जो त्याचे हे नांव जाणतो तो पशुमान् होतो. [ तो ] जाऊन त्याला वधिता झाला. तो विद्ध झाला तो वर गेला. त्याला मृग ह्मणतात. आणि मृगव्याध ह्मणतात तो [ज्याने विद्ध केलें] तोच. जी रोहित् [झाली होती] ती रोहिणी. जो तीन कांडांचा बाण होता तोच हा [आकाशांतला ) त्रिकांड बाण. उत्तर पश्चिम दक्षिण या आकृतींत मृगनक्षत्रांत एकंदर १० तारा दाखविल्या आहेत. त्यांत मध्ये सरळ रेषेत तीन आहेत तो त्रिकांड बाण होय. त्याभोंवतालच्या चार तारा मृगाचे चार पाय होत. आणि या सर्वांच्या उत्तरेस जवळ जवळ तीन तारा आहेत ते मृगाचें *शीर्ष होय. या १० तारांजवळ आकाशांत आणखीही वारीक तारा दिसतात. या सर्वामिळून जो पुंज होतो त्यास युरोपियन ज्योतिषांत ओरायन (Orion) म्हणतात. आरुतीतल्या सर्व तारांकडे पाहिले असतां दिसून येते की रोहिणी, मृग आणि मृगशीर्ष, ही नांवें आरुतींवरून पडली असावी. तसेंच ही सर्व नक्षत्रे उगवून वर येऊन पश्चिमेकडे जात असतां रोहिणीच्या पाठीस मृग लागला आहे आणि त्याच्या पाठीस व्याध लागला आहे असे दिसते; व त्यावरून रोहिणीप्रजापतिकथा कल्पिली असावी. तैत्तिरीय ब्राम्हणांत (१.१.१०) रोहिणीप्रजापतिकथा थोड्या निराळ्या प्रकाराने आली आहे. तिचा सारांश असा आहे की “प्रजापतीन प्रजा उत्पन्न

  • अमुक तारा हे शीर्ष असें जें एथे लिहिले आहे तें, ऐतरेय ब्राह्मणावरून लिहिले आहे. रा० रा. बाळ गंगाधर टिळक यांणी आपल्या Orion नांवाच्या इंग्रजी पुस्तकांत वरील आकृतीपैकीं बाणाच्या तीन तारा, त्यांच्या दक्षिणेच्या दोहोंपैकी पश्चिमेचा तारा आणि यांच्या आसपासच्या ( वरील आकृतीत न दाखविलेल्या) कांहीं तारा मिळून मृगशाषांची आकृति होते असे दाखविले आहे. मी ज्यास शीर्ष म्हटले आहे त्यासच ज्योतिषसिद्धांतात शीर्ष झणतात. (पुढे नक्षनाधिकार पहा).