पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आतां सावनदिवस, सौरदिवस, आणि चांद्रदिवस म्हणजे तिथि, यांविषयीं वि चार करूं. सौरमास स्पष्टपणे वेदांत कोठे आलेला नाही तेव्हां दिवस. सौर दिवस नाहीं हे उघडच आहे. सावनदिवस तर वेदांत असलाच पाहिजे आणि तो आहेच. व्यवहारास सावनदिवस सोईचा आहे. यज्ञ तर सावनदिवसांवर चालत अशी वाक्ये वर आली आहेत. शुक्लकृष्णपक्षांतील दिवस आणि रात्रि यांस निरनिराळी नांवें तत्तिरयिब्राह्मणांत नांवें. आली आहेत. ती अशी:संज्ञानं विज्ञानं दर्शा दृष्टेति ।। एतावनुवाको पूर्वपक्षस्याहोरात्राणां नामधेयानि ।। प्रस्तुतं विष्टुतः सुतासुन्वतीति । एतावनुवाकावपरपक्षस्याहोरात्राणां नामधेयानि ।। तै. बा. ३.१०.१०.२. यांत सांगितलेले अनुवाक त्याच ब्राह्मणांत दुसरे स्थली एकाच अनुवाकांत आले आहेत ते असे:संज्ञानं विज्ञानं प्रज्ञानं जानदभिजानत् ।। संकल्पमानं प्रकल्पमानमुपकल्पमानम्पकृतं कृतं ॥ थेयो वसीय आयत् संभूतं भूतं । तै. ब्रा. ३. १०. १.१. हीं पूर्वपक्षांच्या अहांची (दिवसांची) नांवें होत. प्रत्येक वाक्यांत पांचपांच प्रमाणे ही एकंदर १५ आहेत. दर्शा दृष्टा दर्शता विश्वरूपा सुदर्शना ॥ आप्यायमाना प्यायमाना प्याया सूनृतेरा ॥ आपूर्यमाणा पूर्यमाणा पूरयंती पूर्णा पौर्णमासी ॥ तै. ब्रा. ३.१०.१.१. ही पूर्वपक्षाच्या १५ रात्रींची १५ नांवें होत. पूर्वपक्ष म्हणजे शुक्लपक्ष हे पौर्णमासी वगैरे शब्दांवरून स्पष्ट आहे. प्रस्तुतं विष्टतः सश्स्तुतं कल्याणं विश्वरूपं ॥ शुक्रममृतं तेजस्वि तेजः समृद्धं ॥ अरुणं भानुमन् मरीचिमदभितपत् तपस्वत् ।। तै. बा. ३.१०.१.२. ही अपरपक्षाच्या म्हणजे कृष्णपक्षाच्या १५ दिवसांची नांवें. सुता सुन्वती प्रसता सूयमानाऽभिषूयमाणा ॥ पीती प्रपा संपा तृप्तिस्तर्पयंती ॥ कांता काम्या कामजाताऽयुष्मती कामघा ।। तै. बा.३.१०.१.२, ३. ही रुष्णपक्षांतील १५ रात्रींची नांवें. यांत दिवसांची नांवें नपुंसकलिंगी आणि रात्रींची स्त्रीलिंगी आहेत. दिवसवाची 'अह ' शब्द नपुंसकलिंगी असल्यामुळे दिवसांची नांवें नपुंसकलिंगी आणि 'रात्रि' शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे रात्रींची नांवें स्त्रीलिंगी आहेत असे दिसते. वरील वाक्यांत कृष्णपक्षाच्या शेवटच्या रात्रीचें अमावास्या हे नांव न देतां कामदुधा हे दिले आहे. तथापि शुक्लपक्षांतल्या शेवटच्या रात्रीचे नांव पौर्णमासी हेच आले आहे. वरील वाक्यांवरून आणि दुसऱ्या स्थलांच्या निर्देशांवरून पौर्णमासी आणि अमावास्या हीं नांवें रात्रि या शब्दाची विशेषणे दिसतात. तिथि या शब्दाची नव्हत. तैत्तिरीयसंहिताब्राम्हणांत अमावास्या, पौर्णमासी हीं नांवें पुष्कळ वेळा आली