पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४१) या वाक्यांवरून अमावास्या आणि पूर्णिमा यांवर मास पूर्ण होत असे असे दिसून येते. त्यांतही वरील वाक्यापुढच्याच यो वै पूर्ण आसिंचति परा स सिंचति यः पूर्णादचात प्राणमस्मित्सदधाति यत्पौर्णमास्या मासांत्संपाद्याहरुत्सृजति संवत्सरायैव तत्प्राणं दधति तदन सत्रिणः प्राणंति यदहनोंत्सृजेयुर्यथा दृतिरुपनद्धो विपतत्येव संवत्सरो विपतेदार्तिमायुर्यत्पौर्णमास्या मासान् संपाद्याहरुत्सृजति संवत्सरायैव तदुदानं दधति तदन सत्रिण उदनंति नाति माछति पूर्णमासे वै देवाना सुतो यत्पौर्णमास्या मासान्त्संपाद्याहरुत्सृजति देवानामेव तयज्ञेन यज्ञं प्रत्यवरोहन्ति ॥ तै. सं. ७. ५.६. या वाक्यांवरून पूर्णिमान्त मानाविषयींच विशेष कटाक्ष दिसतो. अथर्वश्रुतींत सृष्टिप्रकरणांत संवत्सर इत्यादिकांची उत्पत्ति सांगितल्यावर मास, पक्ष यांविषयी असें झटले आहे : मासो वै प्रजापतिः ॥ तस्य कृष्णपक्ष एव रविः शुक्लः प्राणः ॥ यांत कृष्णपक्ष प्रथम सांगितला आहे. यावरून पूर्णिमान्त मानाची प्रवृत्ति दिसते. परंतु शुक्लकृष्णपक्षांच्या दिवसांची नांवें तैत्तिरीयब्राह्मणांत आलेली पुढे दिली आहेत (पृष्ठ ४३), त्यांत शुक्लपक्षांतील नांवें प्रथम आणि कृष्णपक्षांतील मागाहून आहेत. यावरून अमान्तमानाचीही प्रवृत्ति दिसून येते. पूर्णिमान्त मास मानिला ह्मणजे त्यांत कृष्णपक्ष प्रथम येतो आणि शुक्लपक्ष पूर्वापरपक्ष. मागाहून येतो. तेव्हां कृष्णपक्षास पूर्व आणि शुक्लास पर अशा संज्ञा असल्या पाहिजेत; परंतु तसे नाही. अनुक्रमें शुक्लरुष्णपक्षांस पूर्वपर या संज्ञा आहेत. पूर्वपक्षं देवान्वसृज्यंत । अपरपक्षमन्वसुराः ॥ ततो देवा अभवन् । परासुराः ॥ तै. बा. २.२.३.१. पूर्वपक्षांत देव उत्पन्न झाले, अपरपक्षांत असुर. ह्मणून देव जय पावले आणि असुर पराभव पावले. पूर्वपक्षाश्चितयः ॥ अपरपक्षाः पुरीषं ॥ तै. बा. ३.१०.४.१. या दोनही वाक्यांत शुक्ल रुष्ण हे शब्द नाहीत, तरी शुक्लपक्ष हा शुभ आणि कृष्णपक्ष अशुभ ही गोष्ट मनांत आणली म्हणजे पूर्वपक्ष म्हणजे शुक्ल आणि अपर म्हणजे कृष्ण असे दिसून येते. पूर्वपक्षाचे १५ दिवस आणि अपरपक्षाचे १५ टिवस यांची नावे पुढे (पृ. ४३) दिली आहेत. त्यांत पूर्व आणि अपर या मंज्ञा शुक्लकृष्ण या अर्थी योजिल्या आहेत. "नवो नवो भवति" या चंद्रासंबंधे मंत्रावरील निरुक्तांत (19. नवो नवो भवति जायमान इति पूर्वपक्षादिममभिप्रेत्यान्हां केतुरुषसामेत्य ग्राम त्यपरपक्षांतमाभिप्रेत्य...॥ कसे म्हटले आहे. यांत पूर्वपक्ष हा शब्द शुक्लपक्षास आणि अपरपक्ष हा शब्द कणपक्षास अनुलक्षून याजिला आहे हे स्पष्ट आहे. वेदोत्तरकालीन इतर ग्रंथांत पर्वापर पक्षांचा हाच अर्थ दिसून येतो. *या वाक्यांवरील शंकांचा विचार करून अमान्त आणि पूणिमान्त ही दोन्ही मानेगांत गादेत असा कालमाधवांत निर्णय केला आहे.